Ladki Bahin Yojna Update : महाराष्ट्र सरकारने महिलांकरिता माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली असून या योजनेच्या अंतर्गत महिलांना महिन्याकाठी १५०० रुपये वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली असून, या बैठकीमध्ये सरकारच्या वतीने ६ महत्त्वाचे नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत.
यामध्ये आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार असून, त्यानुसार ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास १० लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आले तर ५ लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात येईल. याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण सुद्धा करण्यात आलेले आहे.
याचवेळी बैठकीमध्ये सांगण्यात आले आहे की ही योजना राबवताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांकरता या योजनेचा लाभ मिळावा व कुणाचीही हेडसावनी होऊ नये याकरता सुलभ रीत्या कामकाज करण्याकरता निर्णय बजावण्यात आलेले आहे. त्यामुळे ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता काही नवीन नियम व तसेच काही नवीन अटी शर्ती मध्ये बदल करण्यात आलेले आहे.
या बैठकीदरम्यान महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे नव विवाहित महिलांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर महिलांच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवले जातील व त्यामध्ये बदल करावा लागणार आहे.(Ladki Bahin Yojna Update)
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन नियम आणि नवीन अटी शर्ती (Ladki Bahin Yojna Update)
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन सहा अटी नियम व शर्ती मध्ये बदल करण्यात आलेले आहे याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.
- महिलांना या योजनेचा लाभ घेण्याकरता आता पोस्ट बँक खाते सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे
- एखाद्या महिलेचा जर पर राज्यामध्ये जन्म झालेला असेल आणि ती महिला महाराष्ट्र मध्ये अधिवास असलेल्या पुरुषासोबत जर विवाह केला असेल तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यामध्ये बदल करावा लागणार आहे.
- केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलांना सुद्धा लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाइन अर्ज भरून घेण्यात यावा.
- नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल.
- ओटीपी चा कालावधी दहा मिनिटांपर्यंत करण्यात यावा
यादरम्यान अंमलबजावणी करता इति वृत्तीची वाट न बघता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.
15 ते 19 ऑगस्ट पर्यंत महिलांना मिळणार ₹३००० (Ladki Bahin Yojna Update)
यादरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्याकरता शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यानुसार राज्य सरकारकडून कागदपत्रांमध्ये मान्य करता त्यात आणखी बदल करून आता ग्राम स्तरावर ती समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचा ही निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्ट च्या दरम्यान महिला भगिनींना या योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्याची रक्कम ३ हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.