Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मोदी 3.० सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अर्थसंकल्प मांडत असताना निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा सुद्धा केलेल्या आहेत.
सरकारने शेती तसेच शेतीपूरक क्षेत्राकरिता 1.52 लाख कोटी रुपयांची सुद्धा यामध्ये तरतूद केलेली आहे. निर्मला सीताराम यांनी यावेळी असे म्हटले आहे की केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय झालेल्या भाषणामध्ये अर्थमंत्र्याची उच्च शिक्षणाकरता १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाकरिता सरकारकडून आर्थिक मदत सुद्धा जाहीर केली जाणार आहे..
कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग सुद्धा वाढवण्याकडे प्राधान्य देण्यात येणार आहे. अशा प्रकारची घोषणा सुद्धा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली आहे. तसेच वस्तीगृह बांधण्याकरता आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्याकरता भागीदारी करून यामध्ये सुलभता प्रदान केली जाईल असेही यावेळी अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
काय होणार स्वस्त?
- सोने तसेच चांदी स्वस्त होणार
- सोने चांदी वरती 6.5% ऐवजी आता 6 टक्के आहेत कर
- मोबाईल हँडसेट
- मोबाईल चार्जर च्या किमती ह्या 15 टक्क्यांनी कमी होणार आहे
- मोबाईलचे सुटे भाग स्वस्त होणार आहे
- कॅन्सर वरील औषधी स्वस्त होणार आहे
- पोलाद, तांबे या उत्पादनावरील प्रक्रियेवर कर सवलत मिळेल
- लिथियम बॅटरी स्वस्त
- इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहे
- सोलर सेट स्वस्त होणार आहे
- चामड्यांपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू स्वस्त होणार आहे
- पीव्हीसी फ्लेक्स बॅनर स्वस्त होणार आहे
- विजेची तार सुद्धा स्वस्त होणार आहे
काय होणार महाग? (Union Budget 2024-25)
- प्लास्टिक उद्योगांवरती आता करांचा बोजा वाढणार आहे
- प्लास्टिक उत्पादने महागणार आहे
कॅन्सर वरील औषधे स्वस्त होतील (Union Budget 2024-25)
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना असे सांगितले की कॅन्सरच्या औषधावरील आयात कर पूर्णपणे काढून टाकण्यात येईल. वैद्यकीय तसेच कॅन्सरच्या रुग्णांना आता दिलासा देण्याकरता तीन औषधांवरील आयात कर पूर्णपणे काढून टाकला जाणार आहे. त्याचबरोबर एक्स-रे ट्यूब वरील सुद्धा शुल्क कमी करण्यात आलेले आहे. यानंतर आता देशात कॅन्सर वरील तीन औषधे स्वस्त होणार आहे.
नवीन कर रचना काय असणार आहे? (Union Budget 2024-25)
- स्टॅंडर्ड डिडक्शन हे ५० हजारांवरून वरून 75 हजारवर
- ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स हे एकदम फ्री असणार आहे
- 3 ते 7 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 5 टक्के आयकर
- 7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 10 टक्के आयकर
- 10 ते 12 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 15 टक्के आयकर
- 12 ते 15 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 20 टक्के आयकर
- 15 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर 30 टक्के आयकर
कृषी करिता 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे (Union Budget 2024-25)
निर्मला सीतारामन यांनी यावेळी असे म्हटले की, कृषी व सलग्न क्षेत्रांकरिता 1.52 लाख कोटी रुपयांची यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता मोठा फायदा होईल. त्याचबरोबर शेती क्षेत्रामधील उत्पादकता वाढावे याकरता डिजिटल पब्लिक इन्स्पायर स्ट्रक्चर पुरवले जाणार आहे.
जिल्हा परिषद योजनेअंतर्गत शिलाई मशीन, सायकल व ताडपत्रीचे वाटप सुरु; शेवटची तारीख..!
शेती पिकांची सर्वेक्षण मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याकरता आवश्यक ती पावले सुद्धा उचलली जाणार आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये आम्ही पूर्णपणे नैसर्गिक शेती वरती भर देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील काही वर्षांमध्ये एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याकरता मोठे प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
पीएम मुद्रा कर्ज मर्यादेमध्ये वाढ
मोदी सरकार 3.0 यांचा पहिलाच अर्थसंकल्प सादर होत असल्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे. यामध्ये पंतप्रधान मुद्रा योजने करता ही घोषणा करण्यात आलेली आहे. या सरकारी योजनेच्या माध्यमातून मुद्रा कर्जाची मर्यादा ही आता दुप्पट करण्यात आलेली आहे. यापूर्वी या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. मात्र यामध्ये आता वाढ 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे.