जिल्हा परिषद योजनेअंतर्गत शिलाई मशीन, सायकल व ताडपत्रीचे वाटप सुरु; शेवटची तारीख..!(ZP Yojna 2024)

ZP Yojna 2024 : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. परंतु प्रत्यक्षात त्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मधील जिल्हा परिषद च्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. या योजना कोणत्या आहेत आणि या योजनांचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

ZP Yojna 2024
ZP Yojna 2024
WhatsApp Group Join Now

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2024 ते 2025 या वर्षाकरिता २०% व 5% टक्के जिल्हा परिषदचे सेस फंड योजनेच्या माध्यमातून हे अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. व तुमच्या सहकारी मित्रांपर्यंत ही पोस्ट शेअर करावी जेणेकरून त्यांना सुद्धा लाभ मिळेल.

या योजनेविषयीच्या तपशील (ZP Yojna 2024)

  • मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन
  • मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताडपत्री
  • मागासवर्गीय ५ वी ते १० वी ११वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना दोन चाकी सायकल
  • मागासवर्गीय मासेमारी व्यवसायिकांना नायलॉन जाळी
  • पाच टक्क्यांपर्यंत दिव्यांगांना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य योजना

अर्ज कुठे करावा व अर्जाचा कालावधी काय असेल? (ZP Yojna 2024)

या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपासून तर विद्यार्थ्यांना व दिव्यांगांना सुद्धा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांकडून पंचायत समिती कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज 31 जुलै 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

पंचायत समिती स्तरावरती जिल्हा परिषदचे सेस योजनेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. सर्व ग्रामपंचायतकडून अर्ज मागवून ते अर्ज पंचायत समितीकडे सादर करावी लागणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (ZP Yojna 2024)

  • अर्जदाराचा ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला
  • लेडीज सायकल योजना व्यतिरिक्त इतर योजना करता शाळा सोडण्याचा दाखला
  • सक्षम प्राधिकार्‍याने निर्मित केलेले जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • अर्जदाराचे पन्नास हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिकार्‍याद्वारे निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला
  • ७/१२- व ८ अ उतारे
  • कर भरत असल्याची पावती (ग्रामपंचायत मधून घ्यावी)
  • तुमच्या विद्युत बिलाची पावती (electric bill slip)
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • आधार लिंक असलेले बँकेचे पासबुक

या योजने करता अर्ज करणे अत्यंत सोपे आहे तुम्हाला सदर योजनेचा लाभ घेण्याकरता पंचायत समिती स्तरावरून अर्ज मागून घेतले जात आहे. याकरता पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

या योजनेची अर्ज प्रक्रिया व लागणारा कालावधी (ZP Yojna 2024)

  1. सदर योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद स्वउत्पन्नाचा 20% निधी हा अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती व विजभज प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून खर्च करण्यात येत आहे. ही योजना १००% अनुदानित योजना आहे.
  2. या योजनेचा लाभ मिळवण्याकरता पंचायत समिती मार्फत अर्ज कार्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे अर्ज स्वीकारण्यात येतात.
  3. पात्र तसेच अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येते.
  4. समाज कल्याण समितीच्या माध्यमातून उद्दिष्टांच्या अनुषंगाने तालुका निहाय लाभार्थ्यांची निवड सुद्धा करण्यात येते.
  5. निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पात्रतेनुसार कळविण्यात येते.
  6. जे या योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत पूजा लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे अशांना साहित्या करता मंजूर केलेली रक्कम ही DBT अंतर्गत लाभार्थ्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येते.
  7. या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत मध्ये लाभार्थ्यांनी आपल्या साहित्याची खरेदी करून त्यासंबंधीचे देयक म्हणजेच खरेदीची पावती पंचायत समितीमध्ये सादर करणे बंधनकारक असणार आहे.
  8. ही प्रक्रिया किमान २ ते ३ महिन्यांमध्ये पूर्ण होत असते

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे हेक्टरी 27 हजार रुपये जमा होण्यास सुरवात.!

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

या योजनेकरता पात्रता काय असणार आहे याची माहिती आपण वरती सुद्धा दिलेली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या नियमाच्या अंतर्गत उत्पन्न नियमांमध्ये बसत असेल अशा सर्व लाभार्थ्यांना तसेच मागासवर्गीय महिला, शेतकरी व पाचवी ते अकरावी पर्यंतचे विद्यार्थी या योजने करता अर्ज सादर करू शकता.

या योजनेविषयीची अधिक माहिती तुम्हाला प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याकरता खालील प्रसिद्ध पत्रक डाऊनलोड करून लवकरात लवकर अर्ज सादर करावे कारण या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची मुदत ही 31 जुलै पर्यंत आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर अर्ज करणे शक्य होईल तेवढ्या लवकर कर्ज सादर करावे.

सहकार्य करा : ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे तुमच्या जवळील सर्व व्हाट्सअप ग्रुप मध्ये जास्तीत जास्त शेअर करा.

प्रसिद्धी पत्रक डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत