Crop Insurance Letest News : प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून गतवर्षी झालेल्या नुकसानीपोटी ३ लाख 33 हजार १५ शेतकऱ्यांना नैसर्गिक स्थानिक आपत्ती पीक कापणी प्रयोग व अग्रीम रक्कम या तीन घटकांखाखाली 21 जुलै पर्यंत 406 कोटी ११ लाख रुपयांची वाटप करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना विमा कंपनीने दिलेल्या मोबदल्याने शेतकऱ्यांना काही अंशी आता दिलासा मिळण्याचे दिसून येत आहे.
अग्रीम पीक विमा वाटप (Crop Insurance Letest News)
परभणी जिल्ह्यामध्ये गतवर्षी 523 मिलिमीटर पाऊस झाला होता त्यामुळे पावसाने सरासरी ही गाठलेली नव्हती. या परिणामी जो पाऊस झाला तोही खंड स्वरूपाचा असल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते.
आजच्या लोकमत पेपेर ला देण्यात आलेली सदर माहिती
यामध्ये नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन तसेच कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणामध्ये कंबर्डे मोडले गेले होते. त्यामुळे भीमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून संरक्षित केलेल्या पिकाचा मोबदला द्यावा. अशा प्रकारची मागणी लोकप्रतिनिधी सह शेतकऱ्यांनी सुद्धा केलेली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही एक पाऊल पुढे टाका जिल्ह्यामधील चार लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची मदत लागू केली.
त्यानंतर पीक कापणी प्रयोगामध्ये ज्या शेतकऱ्यांची उत्पन्न कंपनीच्या नियमानुसार कमी झाले त्यांना मदत देण्यात आली तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या अशा सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनी द्वारे मदत जाहीर करण्यात आली.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून गतवर्षी ३ लाख ३३ हजार १५ शेतकऱ्यांना ३ घटकांखाली 406 कोटी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना 85 कोटी 30 लाख तर पाठोपाठ जिंतूर तालुक्यामध्ये 66 कोटी 85 लाख रुपयांची वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे या तालुक्यांसह जिल्हा मधील शेतकऱ्यांना या मदतीमुळे काही अंशी आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळण्याची चित्र दिसून येत आहे. मात्र तरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने सरसकट लाभ देण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
या नागरिकांना मिळणार वर्षात ३ गॅस सिलेंडर मोफत! होय.! तुमचे नाव यादीत आहे का? सविस्तर माहिती बघा
तालुका निहाय यादी (Crop Insurance Letest News)
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती अग्रीम रक्कम व पीक कापणी प्रयोगानंतर शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली मदत खालील प्रमाणे
तालुक्याचे नाव | मंजूर झालेला निधी |
गंगाखेड | ४५ कोटी १२ लाख |
जिंतूर | ६६ कोटी ८५ लाख |
मानवत | २६ कोटी ६९ लाख |
पालम | ३८ कोटी २३ लाख |
परभणी | ८५ कोटी ३० लाख |
पाथरी | ३१ कोटी २७ लाख |
पूर्णा | ४० कोटी २९ लाख |
सेलू | ३५ कोटी ०४ लाख |
सोंनपेठ | ३७ कोटी ३२ लाख |
एकूण | 406 कोटी 11 लाख |