weather update : हवामान विभागाद्वारे दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज मुंबईचा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच विदर्भात सुद्धा आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन प्रशासकाच्या वतीने सुद्धा घेण्यात आलेले असून, सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची व गरज असेल तरच घराच्या बाहेर पडण्याची सूचना देण्यात आलेली आहे.
या भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा
आज राज्यामध्ये कुठे पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया तसेच बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज कलर जारी करण्यात आलेला आहे तसेच मुंबई सह ठाणे सिंधुदुर्ग यवतमाळ नागपूर वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा करण्यात आलेला आहे.
जुलै महिन्यामध्ये राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे तसेच राज्यात जुलै महिन्यात राज्याच्या सरासरी 138 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. संपूर्ण राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून के एस होसाडीकर यांनीही माहिती दिलेली आहे. पुढील दोन-तीन दिवस कोकण विभागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच राज्यातील अनेक धरणे 90% भरलेले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पुण्यात सुद्धा पुढील दोन-तीन दिवस चांगला पाऊस बरसणार असून सर्व नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.