Todays Gold Rate : सोन्या चांदीच्या दरामध्ये नेहमीच चढ-उतार बघायला मिळतात. केव्हा सोन्याच्या दरामध्ये वाढ होते तर केव्हा मोठ्या प्रमाणात घसरून सुद्धा बघायला मिळते. आज शनिवारी सुद्धा सोन्याच्या दरामध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. तसेच चांदीच्या दारात सुद्धा मोठा बदल झालेला आहे तर याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. सोन्या चांदीचे आजचे लेटेस्ट दर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ही आज 69 840 रुपये असून मागील ट्रेड मध्ये या मूल्यवान धातूची किंमत ही 70,060 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढ्यावर बंद झाली होती. बुलियन मार्केटच्या वेबसाईटच्या माध्यमातून चांदीचे दर हे ८२800 रुपये प्रति किलो अनुसार विकले जात आहे. त्याचप्रमाणे आपण मागील ट्रेड मध्ये चांदीचे दर जर बघितले तर त्याची किंमत 84 हजार 220 रुपये प्रति किलो एवढे होते. भारतामध्ये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये चढ-उतार सुरू असते.
बुलियन मार्केटच्या वेबसाईट अनुसार आज शहरातील सोन्याचे दर
शहराचे नाव | 22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति दहा ग्रॅम) | 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति दहा ग्रॅम) |
मुंबई | 63 हजार ९०१ रुपये | 69 हजार 710 रुपये |
पुणे | 63 हजार ९०१ रुपये | 69 हजार 710 रुपये |
नागपूर | 63 हजार ९०१ रुपये | 69 हजार 710 रुपये |
नाशिक | 63 हजार ९०१ रुपये | 69 हजार 710 रुपये |
टीप : वर देण्यात आलेले सोन्याचे दर हे सुचक आहेत त्यामध्ये जीएसटी तसेच टीसीएस आणि इतर करांचा समावेश करण्यात आलेला नाही. अचूक दरांच्या माहिती करता तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.
22 व 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक असतो
ज्यावेळेस आपण सोने खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला ज्वेलर कडून एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला २२ कॅरेट सोने हवे आहे की २४ कॅरेट तर याबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कारण आपल्याला यासाठी माहिती हवी की आपण ज्या वेळेस सोने खरेदी करतोय ते किती शुद्धतेचे आहे. जर तुम्हाला कॅरेट बाबत माहिती असेल तर ही बाब चांगली आहे पण ज्या नागरिकांना माहित नाही अशा सर्व नागरिकांनी लक्ष देऊन वाचा.
24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध आहे. आणि 22 कॅरेट अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोने, तांबे, चांदी, जस्त यासारख्या 9 टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जात असतात. 24 कॅरेट सोने हे शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेट मध्ये सोने विकत असतात. त्यामुळे केव्हाही सोने विकत घेत असाल तर दुकानदाराला कॅरेट बद्दल विचार करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.