Sarkari yojana: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल कृषी अभियान अंतर्गत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

लवकर प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल ओळखपत्र म्हणून फार्मर आयडी बनवणे बंधनकारक होणार आहे. कार्डाशिवाय भविष्यात अनेक सरकारी योजना सवलती व निधी मिळणे अवघड आहे.
फार्मर आयडी म्हणजे काय? Sarkari yojana
ओळखपत्र आधार कार्ड,सातबारा,पीक माहिती, बँक खाते व शेतीशी संबंधित सर्व महत्त्वाचे कागदपत्रे त्यांच्याशी जोडले जाते. एकच डिजिटल प्लॅटफॉर्मवर तयार करून सरकार शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहे.
या योजनांचा थेट फटका बसणार Sarkari yojana
किमान आधारभूत किंमत(MSP) योजना: हमीभावाने पिक विकल्या शेतकऱ्याला रक्कम थेट बँक खात्यात मिळते मात्र ओळखपत्राशिवाय डिजिटल पडताळणी होत नाही. पैसे अडकण्याची शक्यता वाढते.
पिक विमा योजना(PMFBY ): नुसकान भरपाई साठी डिजिटल पद्धतीने पिकांची नोंदणी अनिर्वाय आहे. ओळखपत्रशिवाय विमा कंपन्या दावा नाकारू शकता.
शेतकरी क्रेडिट कार्ड(KCC): बँकांना जमीन व पीक याबाबत खात्रीलायक माहिती हवी असते.माहिती ओळखपत्रातून मिळणार असून,कार्ड नसल्यास कर्ज मिळण्यात अडचण येते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: वर्षाला मिळणारा सहा हजार रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो ओळखपत्राशिवाय हप्ता रोखला जाण्याची शक्यता असते.
अनुदान योजना: ठिबक सचिन यंत्रसामग्री खरेदी जैविक खते,बियाणे यांसाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी कर्जाची प्रक्रिया पूर्णत: डिजिटल ओळखपत्र प्रणाली वर आधारित असेल.
भविष्यातील धोरणेही यावर आधारित Sarkari yojana
सरकार भविष्यात प्रत्येक शेतकऱ्यांच्या डिजिटल प्रोफाइल तयार करत आहे. यावर आधारित कर्ज मर्यादा, विमा हप्ता, अनुदान रक्कम निश्चित केली जाते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ओळखपत्र तयार करून डिजिटल प्रणालीशी जोडाणे आवश्यक आहे. असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
नाहीतर आर्थिक फटका निश्चित Sarkari yojana
कार्ड न काढल्यास केवड योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. विविध ठिकाणी कागदपत्रांची प्रक्रियेत वेळ व खर्च वाढवून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढा.