सौरचलित फवारणी पंप ऑनलाईन अर्ज मोबाईल वरून असा करा अर्ज!Sarkari yojana

Sarkari yojana: सौरफवारणी पंप ऑनलाइन अर्ज 2025 पासून सुरू झालेला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज कसा करावा ,जाणून घेऊया.

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध अनुदान योजनेसाठी अर्ज करता येतो. अर्ज तुम्ही आता मोबाईल वरून देखील करू शकता. पूर्ण वेबसाईटचा इंटरफेस हा मोबाईल फ्रेंडली नव्हता, आता वेबसाईट मध्ये बदल करण्यात आलेला असून मोबाईलवर अर्ज देखील करता येतो.

शेतकरी बांधवांना सीएससी सेंटरवर जाण्यास वेळ नाही,किंवा ऑनलाईन सेंटर आता घेऊन येत नाही .असे शेतकरी बांधवांना आता सौरचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन देखील अर्ज सादर करू शकता. फवारणी पंप ऑनलाईन 2025 संपूर्ण माहिती या लेखांमध्ये लिहिलेली आहे.

सौर चलित फवारणी पंपाचे फायदे Sarkari yojana

शेतकरी बांधवांना आपल्या शेतीतील पिकांवर औषधी फवारणी करण्यासाठी फवारणी पंपाची आवश्यकता असते. अनेक शेतकरी बांधवांना पेट्रोल किंवा डिझेल इंजन वर चालणाऱ्या फवारणी पंपाचा उपयोग करून औषधी फवारणी करतात.

फवारणी पंप खरेदी करण्यासाठी खर्च तर येतोच परंतु त्यावर औषधी फवारणी करण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलचा वेगळा खर्च येतो शेतकरी बांधवांना अधिकच खर्च करावा लागतो. आता सौरचली फवारणी पण अनुदानावर मिळणार आहे .शेतकरी बांधवांना महाडीबीटी या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया अगदी सोपी असून, मोबाईल द्वारे देखील आपण अर्ज सादर करू शकतो.

कसा मिळणार योजनेचा लाभ

शेती संबंधित विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना महाडीबीटी वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो .पूर्ण लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. मात्र महाडिपीटी योजनेचा धोरणांमध्ये बदल करण्यात आलेला असून ,प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्याला या नुसार दिल्या जाणार आहे. शिवाय लॉगिन करण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेली आहे.

ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नसेल ,त्या शेतकरी महाडीबीटी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शेतकरी प्रथम अर्ज करतील त्यांना प्रथम लाभ दिला जातो .अर्ज करण्याची प्रोसेस अगदी सोपी असून मोबाईल वरून देखील आपण अर्ज सादर करू शकतो.

सौरचलित फवारणी पंप योजनेचा अर्ज करण्याची पद्धत Sarkari yojana

सौरचरी फवारणी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुमचा मोबाईल मधील गूगल क्रोम ब्राउजर ओपन करा.ब्राउजरच्या सर्च बारमध्ये mahadbt असा शब्द सर्च करा.agri login या लिंकवर क्लिक करा. वेबसाईटला खाली स्र्कोल करा. सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करा. तुमचा शेतकरी आयडी दिलेल्या चौकटीमध्ये टाका.

असा जाणून घ्या तुमचा फार्मर आयडी Sarkari yojana

आधार नंबर टाका ,व गेट ओटीपी या बटनावर क्लिक करा. दिलेला चौकटीत ओटीपी टाकून ओटीपी तपासा या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतकरी ओळख क्रमांक दिसेल सेव्ह करून घ्या व ओके बटनावर क्लिक करा. आता शेतकरी ओळख क्रमांक या चौकटीमध्ये आपोआप समाविष्ट होतो त्याखाली दिसते ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करा. दिलेला चौकटीमध्ये ओटीपी टाईप करा. व ओटीपी तपासा या बटनावर क्लिक करा.

सौरचलित फवारणी पंप ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत Sarkari yojana

महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर अर्ज ऑनलाईन करण्याची प्रोसेस खालील पद्धतीने आहे .अर्ज करण्यासाठी घटकांसाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा. कृषी यांत्रिकिकरण पर्या समोर दिसत आलेल्या बाबतीत निवडा पर्यायावर क्लिक करा. मुख्य घटक या पर्यायासाठी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य या पर्याय निवडा. तपशिलांमध्ये मनुष्यचलित अवजारे या पर्याय निवडा यंत्रसामग्री मध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा मशीन चा पर्याय मधील सौरचलित नॅपसॅक फवारणी पण हा पर्याय निवडून बॉक्सला टिक करा. जतन करा बटनावर क्लिक करा अजून काही अर्ज करायचे असल्यास एस बटणावर क्लिक करा.किवां नो या बटनावर क्लिक करा. अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

महाडीबीटी ऑनलाइन पेमेंट करण्याची पद्धत Sarkari yojana

24 ते 60 एवढी फी नवीन अर्ज आला भरावी लागते. पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसतील, त्यापैकी कोणताही एक पर्याय वापरून पेमेंट करा .शक्यता क्यू आर कोड वापरून पेमेंट करणे सोपे आहे. त्यामुळे पर्या वापरल्यास सोप्या पद्धतीने पेमेंट होते. पेमेंट यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर पावती काढून घ्या. अर्जाच्या पावतीचे प्रिंट काढण्यासाठी किंवा पावती पीडीएफ मध्ये सेव करण्यासाठी घटक इतिहास हा पर्याय दिसेल त्या बटनावर क्लिक करा. लागू केलेले घटक या पर्यावर क्लिक करा. पावती पाया बटना खाली दिसेल असेल की बाणावर क्लिक करा. पावती तुम्हाला दिसेल पावती प्रिंट करून घ्या किंवा तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ मध्ये सेव्ह करा. अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर सौरचलित पंपाची ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी सौरचलित फवारणी पंप योजनेचा लाभ घ्या.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *