sarkari Anudan yojana: शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्राथमिक गरज भासते, ती म्हणजे पाण्याची कारण जर पाणीच नसेल तर शेतकऱ्यांची शेती शक्य नाही. दुसरीकडे शेतीसाठी प्रचंड महत्त्वाचे असलेले पाणी शेतकऱ्यांना उन्हाळा पिकांसाठी पाणी मिळत नाही. अलीकडच्या काळात पाऊस होऊनही पाण्याचे प्रमाण शेतीसाठी कमीच पडत आहे. विहिर किंवा बोरवेलला पाणी कमी असेल ,तर देखील शेतकरी आपल्या शेतीतील पिकांना पाणी देऊ शकणार आहे. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनांमध्ये शक्य झाले आहे. आता या सूक्ष्म सिंचनाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.

सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान sarkari Anudan yojana
शेतकरी मित्रांनो विहीर,तलाव किंवा शेततळ्यात पाणी साठा कमी झाला. पण तुम्ही जर शेती पिकाला पाटाद्वारे पाणी दिले तर तुम्हाला जास्त पाण्याची गरज भासते.
परंतु तुम्ही जर त्या ऐवजी सूक्ष्म सिंचनाचा वापर केला. तर तुम्हाला पाण्याची बचत करून पिकाला हवेत तेवढे पाणी देता येते. त्यामुळे तुम्हाला शेती करणे अधिक सुलभ आहे. मात्र, सूक्ष्म सिंचनासाठी खर्चही येतो.यामुळे अनेक शेतकरी याकडे पाठ फिरवतात.
प्रति थेंब अधिक पीक योजना sarkari Anudan yojana
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी योजना राबवत आहे .त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाण्या संबंधीच्या अडचणी सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चालवण्यात येणारी प्रति थेंब अधिक पीक योजना.
योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान देण्यात येते. या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा फायदा घेऊन आपल्या शेती पिकाला नवा बहर द्यावा. शेतकऱ्यांना अनुदान थेट आपल्या खात्यात देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो.
सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान किती मिळते
सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना 25%ते 90% टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. अनुदान शेतकऱ्यांच्या पाच हेक्टर जमिनीच्या मर्यादेपर्यंत मिळते.
भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान व बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान देण्यात येत आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 25 ते 30 टक्के पूरक अनुदान मिळते.
अनुसूचित जातींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते. अनुसूचित जमाती करता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत या अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा,8अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी,सिंचना साधनांची नोंद सातबारावर आवश्यक आहे. नोंद नसल्यास स्वयंघोषणापत्र गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.