कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी भेट! GR निघाला,प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अनुदान! (Subsidy Announced)

Subsidy Announced : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. सन 2000 चे विचार खरीप हंगामामध्ये कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणाप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाद्वारे घेण्यात आलेला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे.

याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाद्वारे निर्गमित सुद्धा केला गेला आहे. सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी तसेच कापूस व सोयाबीनचे भाव खूपच पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. परंतु महायुती सरकार द्वारे या शेतकऱ्यांकरता अर्थसहाय्य देण्याचा निर्णय लोकसभेच्या निवडणुकी अगोदर घेण्यात आलेला होता. त्यामुळे याविषयीच्या अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात सुद्धा करण्यात आलेल्या होत्या. यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून लवकरच शासनाच्या घोषणाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जमा केले जाणार आहे.

WhatsApp Image 2024 07 30 at 11.37.10 f8c70911
WhatsApp Group Join Now

कुठल्या शेतकऱ्याला किती अनुदान मिळेल? (Subsidy Announced)

राज्य सरकारच्या माध्यमातून या निर्णयाची कृषी विभागाद्वारे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये तातडीने अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. राज्य मधील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टर च्या मर्यादित प्रती हेक्टरी 5000 रुपये (Subsidy Announced) याप्रमाणे अर्थसाह्य शासनाद्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

अधिकृत बातमी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरता एकूण 1548 कोटी 34 लाख रुपये एवढे तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता 2646 कोटी 34 लाख रुपयाचा एकूण 4192 कोटी 68 लाख रुपये इतक्या निधी खर्चा करता मान्यता देण्यात आलेली आहे.

यादीत नाव बघण्यासाठी क्लिक करा

सदर अनुदाना करता ईपीक पाहणी पोर्टलच्या माध्यमातून पिकाची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानाकरता पात्र ठरणार असून, डी पी टी च्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यावरती ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. या निर्णयाच्या आधारावरती राज्यांमधील मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे लाभ मिळणार आहे. माहिती सरकार द्वारे आपला शब्द पाडलेला असून या निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे मनापासून आभार मानले आहे. (Subsidy Announced)

सहकार्य करा : ही माहिती खालील दिसत असलेल्या सोशल मीडिया आयकॉन वरती क्लिक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याविषयी माहिती होईल व आर्थिक मदत मिळेल.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत