Ration DBT:राज्यातील 14 दुष्काळग्रस्त शेतकरी या जिल्ह्यातील केशरी रेशन धारक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी रेशन ऐवजी थेट तुमच्या खात्यात पैसे जमा करण्याचा योजनेला गती 44 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

राज्यात दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील केशरी शीधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्माण घेतलेला आहे. या शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.या योजनेला अखेर गती मिळालेली आहे. यासाठी 44 कोटी 89 लाख 42 हजार 650 रुपयाचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे
14 जिल्ह्यात 26 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ Ration DBT
अन्नधान्य पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने 4 सप्टेंबर पासून शासनाने निर्णय काढून निधी वितरित केला जात आहे. या निर्णयामुळे राज्यातील 14000 जिल्ह्यातील एकूण 26 लाख 17 हजार 545 पात्र लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत आहे. गेला काही काळापासून हे अनुदान प्रलंबित असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत आहे अखेर प्रतीक्षा आता संपलेली आहे.
रेशन ऐवजी आता प्रति लाभार्थी प्रति महिना 170 रुपये मिळणार आहे
यापूर्वी या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 150 रुपये दिले जात होते.मात्र, 20 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार रकमेत वाढ करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना 170 रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक हातात दिली जात आहे. या योजनेचा एकच नसून एका निरंतर प्रक्रिये म्हणून राबवली आहे. शासनाने याला मंजुरी दिलेली आहे.
निधी वितरणातील अडथळे दूर शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
या योजनेचा अंमलबजावणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडून मार्फत डीबीटी द्वारे वितरित करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली होती. मात्र ,यात काही तांत्रिक अडचणी आल्या असल्याने निधी वितरणास विलंब होता .आता शासनाने अडथळे दूर करून निधी वितरणाचा मार्ग मोकळा केलेला आहे. या योजनेचा अंमलबजावणीसाठी नोट अधिकारी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेले आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश Ration DBT
या योजनेअंतर्गत खालील 14 जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
मराठवाडा: छत्रपती संभाजी नगर ,जालना, बीड ,धाराशिव, लातूर,नांदेड, हिंगोली, परभणी विदर्भ: अमरावती, अकोला ,बुलढाणा, यवतमाळ ,वाशीम आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे.
दहा ते बारा तारखेपर्यंत रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता
शासनाने निधी मंजूर केला असून, आता लवकरच हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.साधारणपणे येत्या दहा ते बारा सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा अनुदान खात जमा झाले आहे की नाही. हे तपासण्यासाठी प्रक्रिया आणि बँका त्याची माहिती कशी तपासावी याबद्दलची माहिती लवकर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळणार आहे.