PM Mandhan yojana :देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या अनेक योजना हे लहरी हवामानामुळे शेतीचे उत्पन्न कमी अधिक होते.शेतकऱ्यांचा अनेकदा खर्चही भरून निघत नाही.वय वाढल्यावर शेतीत पूर्वीसारखं काम करता येत नाही. अशा वेळी मदतीचा हात लागतो.याबाबत लक्षणे केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना पेन्शन निवृत्तीवेतन देण्यात येते त्यामुळे त्यांना एक आर्थिक हातभार लागतो.

पंतप्रधान शेतकरी मानधन योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली या योजनेत अगोदर शेतकऱ्यांना एक ठराविक रक्कम जमा करावी लागते.ही रक्कम जमा झाली की वयाच्या साठीनंतर पेन्शन लागू होते. जितक्या कमी वयात योजनेची नोंद कराल तितक्याच कमी प्रीमियर येतो आणि पेन्शन लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशी प्रक्रिया आहे.
अर्ज कसा करायचा PM Mandhan yojana
किसान मानधन योजनेसाठी अर्ज करावा लागतो. त्यासोबतच आधार बँकेचे पासबुक वयाचा दाखला जोडावा लागतो. जवळच्या सेवा केंद्रावर आधार क्रमांक आवरून योजनेसाठी नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यावर शेतकऱ्यांना एक निश्चित योगदान राशी दरमहा जमा करावी लागते.
शेतकऱ्यांच्या वयाच्या आधारे प्रीमियर ठरवता येतो. त्या आधारे सदर माहिती रक्कम योजनेत जमा होते.शेतकरी जितक्या लवकर या योजनेसाठी नोंदणी करेल तितक्याच त्याचा प्रीमियर कमी होतो.या योजनेचा सरकार प्रीमियर इतकी रक्कम जमा करते. वयची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर दर मा तीन हजार रुपयांचे पेन्शन मिळते. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.