किसान सन्मान व नमो शेतकरी महा सन्मान निधीच्या हप्त्याची तारीख जाहीर सविस्तर माहिती बघा (Pm Kisan Installment 2024)

WhatsApp Group Join Now

Pm Kisan Installment : केंद्र शासनाच्या किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या आणि नमो शेतकरी महासंबंधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. परंतु अद्यापही जिल्ह्यामधील 4789 शेतकऱ्यांनी एकेवायसी आणि ४८४१ शेतकऱ्यांनी आधार सीडिंग जोडणी केलेली नाही. त्यामुळे प्रसंगी हे Pm Kisan Installment शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अशा शेतकऱ्यांनी त्वरित आपली ई केवायसी तसेच आधार जोडणी करणे आवश्यक असणार आहे.

WhatsApp Image 2024 06 09 at 10.16.18 622e262d

फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान जिल्ह्यामधील 8000 शेतकऱ्यांनी कीवायसी केलेली नव्हती त्यामुळे हे शेतकरी योजनेच्या लाभांपासून वंचित राहिलेले होते. मधल्या काळामध्ये प्रशासकीय पातळीवरती हालचाली केल्यामुळे आता जिल्ह्यामधील 4841 शेतकऱ्यांनी ही समस्या मार्गी लागलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली इकेवायसी व आधार लिंकिंग व बँक खात्याला डीबीटी अनेबल करावे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखेमध्ये जाऊन खाते उघडून त्याला आधार कार्ड ची जोडणी करावी.

शेतकऱ्यांसाठी निवडणूक निकालानंतर चे सरकारकडून घेण्यात आलेले मोठे निर्णय.!

अशा प्रकारे जिल्हा कृषी अध्यक्ष अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी स्पष्ट केलेले आहे. अन्यथा जुलैमध्ये या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

दोन्ही योजना चे मिळून वार्षिक मिळत सहा हजार रुपये Pm Kisan Installment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महास्माननिधी योजना मार्फत वार्षिक प्रत्येकी 6 हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची ही केवायसी आणि आधार सीडिंग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे कृषी विभागाने म्हटले आहे. प्रशासनाने वारंवार शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत