Pik vima yojana: पंतप्रधान पिक विमा योजनेत सीएससी केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी चारशे रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केलेला आहे.

शेतकऱ्यांनी विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क देऊ,नये असे आवाहन कृषी विभागाने केलेल्या विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन,असे आवाहन विभागाने दिलेले आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70%आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य पंतप्रधान पिक विमा योजना राबविण्यात येत आहे.पुणे,सोलापूर,अहिल्यानगर जिल्ह्यात पिक विमा योजना भारतीय कृषी विभाग कंपनी मार्फत राबवण्यात आलेली आहे. खरिपातील भात,ज्वारी, बाजरी,नाचणी, मका, तूर, मुंग, उडीद,सोयाबीन,भुईमूग,तीळ, कापूस व कांदा पिकांसाठी शेतकऱ्यांना भाग घेता येणार आहे. असे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी स्पष्ट केलेले आहे.
योजनेत भाग घेण्यासाठी ऑग्रिस्टॉक नोंदणी क्रमांक व इपिक पाणी बंधनकारक आहे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग ऐच्छित आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टिक नोंदणी क्रमांक सात बारा उतारा बँक पासबुक,आधार कार्ड, व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र बँकेत देणे आवश्यक आहे. याशिवाय सामान्य सुविधा केंद्र सीएससी आपले सरकार सुविधा केंद्र तेथे किंवा अधिकृत पोर्टलवर ही अर्ज भरता येऊ शकतो. अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या 14447 या क्रमांकावर संपर्क करा.
केंद्र सरकारने निश्चित केलेले शिल्लक संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागाला दिले जाते.एखाद्या अर्जदाराने फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पुढील किमान पाच वर्ष यादी काढून टाकून सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.ई- पिक पाहणी विमा घेतलेले पीक यात तफावत आढल्यास विमा अर्ज रद्द होऊ शकतो.असे कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे.महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.