Pik vima yojana: राज्य शासनाने मागील वर्षी एक रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू केलेली होती. मात्र,लाडकी बहिण योजनेमुळे शासनाकडे आर्थिक मंदी जाणवायला सुरू झालेली होती.

यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही योजना बंद करून एक नवीन सुधारित पिक विमा योजना 2025 चा खरीप पिकांच्या हंगामासाठी राबवण्यात सुरू आहे.
मागील वर्षाचा पिक विमा मंजूर झालेला असूनही त्या मार्फत पात्र व नुसकानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती. नैसर्गिक प्रकोपमुळे व संकटांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई शासनामार्फत घेण्यासाठी 2025 ला पीक विमा योजना Apply online करणे आवश्यक आहे. त्यांची सर्व माहिती तुम्हाला खाली बघायला मिळेल.
मोबाईल वरून पिक विमा असा भरा.Pik vima yojana
या वर्षाचा खरीप हंगामातील पिकांच्या संरक्षणाकरता राज्य शासनाने नवीन पॉलिसी बनवलेली आहे.कुठेही घोटाळा होऊ नये, याकरिता सुद्धा शासनाने अधिक दक्षत घेतलेली आहे.
तुमच्या मोबाईल मध्ये crop lnsurance ॲप इन्स्टॉल करून घ्या. नंतर पुढे त्याला ओपन करून घेतल्यावर तुमच्यापुढे ॲप चे डॅशबोर्ड येईल, तिथे लॉगिन करा. त्यावर क्लिक करायचे आहे. मागील वर्षांनी ऑनलाइन अर्ज करत असताना मोबाईल नंबर टाकला होता,तो मोबाईल नंबर तिथे टाकायचा लॉगिन करून ओटीपी यावर क्लिक करायचे आहे. मात्र काही सेकंदातच तुमचा नंबर ला एक ओटीपी दिला जातो. त्याला तिथे भरा नंतर पीक विमा योजना एप्लीकेशन ऑनलाइन करण्यासाठी pmfby insurance असा पर्याय दिसतो .
त्यावर क्लिक करून आता तुमच्यापुढे पीक विमा योजना ॲप ओपन होऊन फॉर्म येतो. त्यामध्ये तुम्ही चालू खरीप हंगाम,pmfby आणि चालू वर्ष निवडा सर्व निवडल्यावर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या बँकची माहिती बदलायचे असेल तर ऍड न्यू अकाउंट या पर्यायावर क्लिक करून बदल करता येतो.परत सेव नेक्स्ट बटनावरती क्लिक करून तुमच्या स्वतः विषयी माहिती ऑटोमॅटिक भरली जाते.
आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर शेताचा पत्त्यासाठी एक अर्ज येतो.त्यामध्ये सर्व शेतीचा पत्ता सविस्तर भरावा लागतो.त्यानंतर प्रोसाईड पर्यायाला निवडा सर्व पिकांची सविस्तर माहिती भरावी लागते. तसेच पेरणी ची तारीख व शेतमालाची माहिती सुद्धा तिथे मांगता सर्व भरणे प्रोसिड बटणावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला किती एकर शेतीसाठी पिक विमा भरायचा आहे. त्याची माहिती पुढील भरायची आहे.म्हणजेच त्याच्याखाली तुम्हाला किती विम्याची रक्कम भरावी लागणार आहे. हे दाखवतात मग प्रोसिड बटनावर क्लिक करा.नंतर पुढे तुमच्या पिकांचे नुकसान झाल्यावरती किती नुकसान भरपाई मधून मिळू शकेल,याची माहिती बघता येते. तुम्ही इतर पिकांसाठी सुद्धा अर्ज करू शकणार आहे.
सर्व झाल्यावर प्रोसिड करा.आता तुम्हाला तुमचे काही कागदपत्र अपलोड करावे लागतात. तुमच्या बँक पासबुक,पासपोर्ट फोटो, सातबारा,8अ उतारा, स्वयंपोषणापत्र इत्यादी कागदपत्रे लागणार आहे. शेवटी सबमिट बटनार क्लिक करून तुमच्या पॉलिसी नंबर बनेल पार्ट एक प्रोसिड करून तुम्हाला पिक विम्याची रक्कम भरता येते.
पिक विमा एक आपल्या शेतीतील पिकांचे संरक्षण करणारी योजना आहे. सध्या राज्यभरात योजनेचे अर्ज भरणे सुरू आहे. व शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यामुळे अंतिम तारखेच्या आत तुम्ही अर्ज भरून घ्या. अडचण आली तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप ॲप ला जॉईन करून विचारू शकणार आहे.