बँकेकडून कर्ज हवे आहे का जाणून घ्या किती पगार आवश्यक आहे आणि कर्जाच्या इतर अटी personal loan

WhatsApp Group Join Now

personal loan आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात. तसेच चांगले वेळी सुद्धा गंभीर आजारांसारख्या वाईट घटना तसेच घरामध्ये येणारे विवाह सोहळे मुलांची शिक्षण तसेच बाहेर फिरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी आपल्याला पैशांची आवश्यकता भासत असते. अशा वेळेला तुमच्याजवळ पैसे असणे आवश्यक असते. आपल्याजवळ पैसे नसेल तर आपण आपल्या मित्रांना तसेच आपल्या परिवारातील सदस्यांना आपल्याला पैसे मागावे लागतात.

खालील दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती समजून घ्या

आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी तसेच मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे व अत्यावश्यक वस्तूंसाठी आपल्याला वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते. सद्यस्थितीमध्ये आपल्याला वैयक्तिक कर्ज हे खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी कागदपत्रे जमा करून घेता येते. मात्र विशिष्ट बँक तसेच पतसंस्थांद्वारे कर्ज घेत असताना काही पात्रता व अटी ठरवण्यात आलेल्या आहे. या गोष्टींची पूर्तता करणे आपल्याला आवश्यक असते. बँकेकडून तसेच पतसंस्थांद्वारे ठरवण्यात आलेल्या अटी आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या पात्रते अनुसार कर्ज प्राप्त करून दिली जाते.

किती पगार असेल तर वैयक्तिक कर्ज मिळेल?

वैयक्तिक कर्ज हे प्रत्येक व्यक्तीच्या पात्रतेनुसार मिळवून देण्यात येते. यामध्ये नोकरीवर असलेल्या व्यक्तींना मोठ्या बँकेतून वैयक्तिक कर्ज करता पात्र होण्यासाठी किमान 30 हजार रुपये पगार असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये सेवानिवृत्त व्यक्ती कर्ज घेण्यासाठी पात्र ठरू शकत नाही.

काही बँक तसेच पतसंस्था कमीत कमी सॅलरी मध्ये वैयक्तिक कर्ज मिळवून देतात. उदाहरणार्थ 15000 पगार असेल तरी वैयक्तिक कर्ज मिळू शकते. मात्र या कर्जावरती तुम्हाला अधिकचा व्याजदर द्यावा लागू शकतो. कुठलेही वैयक्तिक कर्ज घेत असताना त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणे खूप गरजेचे असते.

वैयक्तिक कर्ज घेत असताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही जर केव्हाही वैयक्तिक घेणार असाल तेव्हा तुम्हाला किती रक्कम दिली जात आहे. त्या रकमेची परतफेड किती वर्षासाठी आहे. देण्यात येणाऱ्या रकमेवरती व्याजदर किती असणार आहे. तसेच तुम्हाला इतर कुठले चार्जेस द्यावे लागणार आहेत का? या आवश्यक बाबींविषयीची खात्री करून घेणे खूप गरजेचे ठरते. त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेत असताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत