Pavsacha andaj: राज्यातील काही भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे.

उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.राज्याच्या काही भागात हलक्या मध्यम सरी पडतील.अशी शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे.
आज कोकण,मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.रत्नागिरी,रायगड , मुंबई,ठाणे जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला असून, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, पुणे,नाशिक ,धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीत पडेल,शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
उद्या कोकण घाट माथ्यावर पावसाचा जोर कमी असून उघडीप रहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली तर,पुणे,सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे.बुलढाणा,अकोला नागपूर,चंद्रपूर, भंडारा, गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
गुरुवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव व नांदेड विदर्भातील अमरावती, नागपूर ,भंडारा ,गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान राहून हलक्या सरी पाऊस पडणार.कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या उ पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जर कमी राहून ढगाळ हवामानाची शक्यता आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज विदर्भात पावसाची उघडी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे.