8 हजार 476 शेतकऱ्यांना मिळणार 7 कोटी रुपये; या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होणार.! (Nuksan Bharpai news)

Nuksan Bharpai news : जिल्ह्यामध्ये एप्रिल व मे 2024 या २ महिन्याच्या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते महसूल कृषी विभागाने पंचनामे केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य शासन नुकसानी संदर्भाने निधी मागणी केली. त्यानुसार राज्य शासनाद्वारे एप्रिल व मे या दोन महिन्यांमध्ये झालेल्या नुकसानी पोटी 8 हजार 476 शेतकऱ्यांना ६ कोटी 99 लाख रुपये देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.सदरील रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

बीड जिल्ह्यातील एप्रिल मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये एका हंगामात एका वेळी याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत आहे.

Nuksan Bharpai news
WhatsApp Group Join Now

केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण व आकस्मित आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाकीच होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे.

22 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार अवेळी पाऊस गारपिट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करता सुधारित दराने २ व ४ हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे दरम्यान महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेस पंचनामे करून त्याचा अहवाल वेळेत पाठविला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मागणीचा निधी वेळेवर राज्य शासनाकडे सादर झाला बाधित शेतकऱ्यांना निधीचा मोठा आधार होणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पद्धतीने मदत होईल जमा (Nuksan Bharpai news)

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर नुकसानीची रक्कम (Nuksan Bharpai news) डीबीटी पोर्टल द्वारे वितरित होणार आहे यासाठी लाभार्थ्यांची अचूक माहिती विहित नमुन्यात तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरण्याचे काम अधिकारी करणार आहेत. तसेच लाभार्थ्यांच्या मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या नावाची यादी कशी बघावी? (Nuksan Bharpai news)

शासनाकडून लाभार्थ्यांच्या मध्ये वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी ही जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ही लाभार्थी यादी आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईट वरती चेक करू शकता.

यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकाऱ्यांना सूचना (Nuksan Bharpai news)

शेतकऱ्यांना नुकसानीची मदत वाटप करताना राज्य शासनाद्वारे काही सूचना केलेल्या आहेत

  • एका हंगामामध्ये एकच वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत दिली जात आहे का, याची खात्री करावी
  • कोणताही लाभार्थी दोन वेळा मदत दिली जाणार नाही याची काळजी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाने काटाक्षाने घ्यावी
  • जास्तीत जास्त तीन एकरच्या मर्यादित मदत दिली जात असल्याची खातर जमा करावी
  • याकरता निधी दिला आहे त्यासाठी त्याचा वापर करावा यासह इतर सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.

5000 रुपयाचे अनुदान या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.! सविस्तर माहिती बघा

अशाप्रकारे शेतकऱ्यांना हा निधी वाटप केला जाणार असून, नुकसान भरपाईसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाई लवकरात लवकर जमा केली जाणार असल्याचे शासनाकडून सांगितले गेले आहे.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत