Nuksan Bharpai : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या कारणामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची मदत जाहीर करण्यात आलेली होती. अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळत आहे. कारण ज्या वेळेस शेतकऱ्यांचे नैसर्गिकरीत्या नुकसान होते त्यावेळेस सरकारकडून आर्थिक मदतीची तरतूद जाहीर केली जाते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी निर्णय जारी (Nuksan Bharpai)
त्याचप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीं करता देखील सरकार द्वारे मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27-3-20२३ रोजी आनंदवे राज्य शासनापती प्रतिसाद निधीचे निकष करण्यात आलेले आहे.
सरकारी जीआर अनुसार नमूद केलेल्या पेज क्रमांक पाच वरती दिनांक 9 11 2023 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या कारणांनी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता दोन हेक्टर यांची तीन हेक्टर मदत जाहीर करण्यात येत आहे.
खरीप हंगाम 2023 दुष्काळ जाहीर (Nuksan Bharpai)
हंगाम खरीप 2023 करिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरता शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून राज्य शासनाच्या निधीमध्ये एकूण रुपये २ लाख 44 हजार 322 लाख लक्ष एवढा निधी वितरित करण्याकरता सरकार द्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे.
पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा! या शेतकऱ्यांच्या खात्यात 76 कोटी रुपये जमा झाले
या शासन निर्णयांतर्गत अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना एका हंगामात एकच वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते.