या 26 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर.! जिल्ह्याचे नाव बघा.! (Nuksan Bharpai 2024)

Nuksan Bharpai 2024 : राज्य सरकारकडून अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यामध्ये नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 यादरम्यान विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी बघायला मिळाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सुद्धा दिसून आले होते. या अनुषंगाने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारा नुकसानग्रस्त शासन निर्णय पारित केलेला आहे.

या निर्णयामध्ये अतिवृष्टी वादळ यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या (Nuksan Bharpai 2024) नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे झालेले नुकसान पुढील हंगामा करता निष्ठा अनुदान स्वरूपामध्ये मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकार द्वारे नोव्हेंबर तसेच डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये एकूण 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते मे 2024 या दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई कोटी शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा मदत निधी दिलेला आहे.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

मातृ नोव्हेंबर 2023 ते जुलै २०२४ यादरम्यान झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदतीकरता विभागीय आयुक्तालयाद्वारे निधीचा प्रस्ताव जारी करण्यात आलेला होता. यानुसार राज्य सरकार द्वारे ३०७ कोटी रुपयांच्या निधीला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे.

या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई (Nuksan Bharpai 2024)

छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, तसेच विदर्भामधील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तसेच कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

कुठल्या क्षेत्राला मिळणार नुकसान भरपाई (Nuksan Bharpai 2024)

यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांकरता तीन एकरच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येणार आहे. याची वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहे अशा प्रकारचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहे.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

याच दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे सरकारने मदत जाहीर करावी याकरता पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच राज्य सरकारने वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नसल्याची सुद्धा आरोप यावेळी केले गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने ही मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत