मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; या शेतकऱ्यांना मिळणार मोफत ५ वर्षे वीज (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024)

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 : सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे कारण शेतकरी बांधवान करता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत मोफत देण्यात येणार आहे. याविषयीचा दिनांक २५ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार द्वारे जीआर (GR) सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. हा जीआर सरकारकडून शासन उद्योग ऊर्जा कामगार खनि कर्म या विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे.

याबाबतचा जीआर सुद्धा आपण या लेखांमध्ये डाऊनलोड करण्यासाठी दिलेला आहे. तुम्हाला याविषयीची सविस्तर माहिती वाचायचे असेल तर खाली डाऊनलोड बटन वरती क्लिक करून संपूर्ण जीआर तुम्ही वाचू शकता.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान होणार असून, भविष्यामध्ये यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नियोजन करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत विज योजना बाबतचा शासन निर्णय (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024)

महाराष्ट्र राज्य मधील 2024 च्या सर्वेनुसार 47.41 इतके कृषी पंप ग्राहक आहेत. या सर्व शेतकऱ्यांना महावितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा करण्यात येतो. संपूर्ण क्षेत्रापैकी 30 टक्के ऊर्जेचा वापर हा शेती क्षेत्रासाठी करण्यात येतो. यापैकी एकूण 39 हजार 246 दशलक्ष युनिट हा ग्राहकांचा वार्षिक वापर यामध्ये केला जातो.

शेतकऱ्यांना जर या विजेचा वापर करायचा असेल तर या करता त्यांना काही ठराविक टाईम सुद्धा देण्यात आलेला असतो. यामध्ये शेतकऱ्यांना विद्युत पंप वापरण्याकरता तीन फेजची वीज ही फक्त ८ किंवा ६ तासासाठी देण्यात येत असते. हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना वीज उपलब्ध राहत नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

हे पण वाचा : मोफत शिलाई मशीन योजना,यासाठी अर्ज कसा कराल ?पात्रता काय ?कागदपत्रे कोणती?

पुढील ५ वर्षांपर्यंत मोफत वीज योजना (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024)

या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना गरजू शेतकऱ्यांकरता राबवली जात आहे. ही योजना ५ वर्षांपर्यंत कार्यरत असणार आहे.

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 (1)
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 (1)
WhatsApp Group Join Now

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024)

राज्यामधील जे शेतकरी 7.5 Hp पंप ग्राहक त्यांना एप्रिल 2024 पासून मोफत वीजपुरवठा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत मोफत वीज वितरित करण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी हा पाच वर्षाचा असणार असून ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 20२9 पर्यंत लागू असणार आहे. यामध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर ज्या या योजनेमध्ये काही बदल करायचा असेल तर ते बदल करू शकतात या योजनेचा आढावा घेण्यात येईल.

तुम्हाला सुद्धा या योजनेबाबत अधिक सखोल माहिती व्यवस्थित रित्या जाणून घ्यायची असेल तर खाली डाउनलोड बटन वरती क्लिक करून संपूर्ण जीआर व्यवस्थित रित्या तुम्ही वाचू शकता.

सहकार्य करा : ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. पोस्ट शेअर करण्यासाठी तुम्ही खालील सोशल मीडिया आयकॉन वरती क्लिक करून ती पोस्ट शेअर करू शकता.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत