Mini tractor Scheme : सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सामान्य नागरिकांसाठी राबविल्या जातात मात्र प्रत्यक्षरीत्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे बरेच नागरिक या योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे सदर योजना काय आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हा लेख व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत वाचा व माहिती आवडल्यास गरजू नागरिकांना शेअर करून आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. चला तर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सध्या निवडणूक जवळ येत असल्यामुळे सरकारकडून नवनवीन योजना नागरिकांना वितरित केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळेत या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांमधील स्वयंसहाय्यता बचत गटांकरिता मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने त्याचा पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजने करता अर्ज भरण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत ठीक ६ वाजेपर्यंत मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्याकरता जास्तीत जास्त अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध घटकांमधील स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज सादर करण्याचे आव्हान समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केलेले आहे.
मिनी ट्रॅक्टर योजने करता किती अनुदान मिळणार (Mini tractor Scheme)
या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती तसेच नवोदय घटकांमधील संयम सहायता बचत गटांकरिता 90% अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच जसे की रोटावेटर कल्टीवेटर व ट्रेलर यांचा सुद्धा यामध्ये पुरवठा करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता (Mini tractor Scheme)
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हा महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अध्यक्ष तसेच सचिव व 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकातील असावे
- या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर तसेच त्याची उपसाधने त्यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ही ३ लाख 50 हजार एवढी असेल
या योजनेचा लाभ मिळवण्याकरता पात्र लाभार्थ्याला बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १० टक्के स्वतः रक्कम भरल्यानंतर उर्वरित 90% शासकीय अनुदान देण्यात येईल. योजने करता ३ लाख 50 हजार पेक्षा अधिकची रक्कम संबंधित बचत गटांना स्वतः खर्च करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही जर ३ लाख 50 हजाराच्या वरती मिनी ट्रॅक्टर खरेदी करत असाल तर जी वरील रक्कम असेल ती स्वतः संबंधित बचत गटाला खर्च करावी लागणार आहे.
योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळवावा? (Mini tractor Scheme)
या योजनेचा लाभ घेण्याकरता स्वयंसहायता बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावाने एक बँक खाते उघडावे लागणार आहे व हे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांक सलग्न करावे लागणार आहे. कारण या अनुदानाची रक्कम या खात्यामध्ये जमा करून देण्यात येत असते.
योजनेचा लाभ मिळवल्यानंतर नियम व अटी (Mini tractor Scheme)
योजनेच्या माध्यमातून मिळालेला मिनी ट्रॅक्टर याच्या माध्यमातून संयम सहायता बचत गटाचे जर उत्पन्न वाढवावे असा हेतू ठेवून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर सुद्धा देता येणार आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या साधनांची विक्री किंवा सावकार व अन्य व्यक्तींकडे ते गहाण ठेवता येणार नाही.
हे पण वाचा : आता व्यवसायासाठी करा अर्ज मिळणार 50 टक्के अनुदान ; शासनाची बीज भांडवल योजना
योजनेविषयी माहितीसाठी संपर्क करा (Mini tractor Scheme)
तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर या योजनेच्या अधिक माहिती करता तसेच अटी व शर्ती जाणून घेण्याकरता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासरडी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड यांच्या कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावा. असे सुद्धा या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
सहकार्य करा : ही माहिती जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत शेअर करा. माहिती शेअर करण्यासाठी खालील सोशल मीडिया माध्यमातून क्लिक करून तुम्ही एका क्लिकमध्ये ही माहिती शेअर करू शकता.