Majhi Lek Yojana:माझी लेक योजनेबद्दल माहिती जाणून घ्या.ही योजना विशेष: दिव्यांग पालकांच्या मुलींना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत , पात्र मुलींच्या नावावर ₹५०,००० ची मदत(Fixed Deposit)ठेवली जात आहे. ही योजना दिव्यांग पालकांना त्यांच्या मुलींचे शिक्षण आणि भविष्यातील गरजांसाठी मदत करणे,ही रक्कम मुलींच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला मिळणार ज्यामुळे तिला करिअर किंवा विवाहासाठी आर्थिक मदत मिळेल,या योजनेबद्दल माहिती पाहूया.

योजनेचा मुख्य उद्देश Majhi Lek Yojana
दिव्यांग पालकांना अनेकदा त्यांच्या मुलींच्या भविष्यासाठी बचत करणे शक्य होत नाही. त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागीय यांनी ही योजना सुरू केलेली आहे. यांचा मुख्य उद्देश म्हणजेच कुटुंबातील मुलींना शिक्षण सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणे आहे. यामुळे त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय त्यांचे स्वप्न पूर्ण करता येईल.
योजनेसाठी अर्ज कसा कराल? Majhi Lek Yojana
माझी लेक लाडकी योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो.अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. अधिकृत वेबसाईटला भेट देऊन वेबसाईटवर User Registration लिंक वर क्लिक करा.सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन कॉपी अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यावर संदेश क्रमांक Reference Number लक्षात ठेवा. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज करण्याची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे.त्यामुळे वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Majhi Lek Yojana
पालकांचे दिव्यांग प्रमाणपत्र, पालक आणि मुलींच्या आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे ,रहिवासी पुरावा, रेशन कार्ड वीज बिल, मुलांचे जन्म प्रमाणपत्र,मुलीच्या नावावरील बँक पासबुकची झेरॉक्स, स्वयंघोषणापत्र अशा कोणती सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
योजनेत कोण पात्र असणार आहे.Majhi Lek Yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आणि खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. पालक दिव्यांग असावा, मुलगी 0ते 18 वर्षाचा वयोगटातील असावी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, अर्जदार महाराष्ट्रातला रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने पूर्ण अशा प्रकारच्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अधिक माहितीसाठी संपर्क Majhi Lek Yojana
योजनेबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही स्थानिक जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभागाशी संपर्क साधू शकता. योजनेसाठी पात्र असाल ,तर नक्कीच अर्ज करा. तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करा. योजनेचा लाभ घ्या.