Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment : महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये वितरित केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरता राज्य सरकारकडे कोटीच्या घरामध्ये आतापर्यंत अर्ज प्राप्त झालेले आहेत. राज्यामधील अनेक महिलांचे अर्ज पडताळणी करून सरकारद्वारे मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहे.
सरकारने मागील काही दिवसा अगोदर अशाप्रकारे जाहीर केले होते की महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये पहिला व दुसरा हप्ता (Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment) जमा केला जाणार असून पात्र महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा करण्यात येतील. याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.
माझी लाडकी बहीण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment)
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पूर्ण महाराष्ट्रभर फेमस झालेले असून या योजने करता महाराष्ट्रातून दोन कोटींच्या जवळपास ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार गरीब परिवारातील महिलान करता दर महिन्याला १५०० रुपये देणार असून या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्र राज्यातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
माझी लाडकी बहीण योजने करता पात्र महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पहिला व दुसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे. परंतु आतापर्यंत ज्या महिलांनी आपले ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले नाही किंवा अर्जामध्ये त्रुटी साठी पाठवलेले आहे. किंवा ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अशा सर्व महिलांनी आपल्या अर्जा विषयीची संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या तपासून अपडेट करून घेणे गरजेचे आहे.
कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे? (Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment)
सद्यस्थितीमध्ये बऱ्याच बातम्या व्हायरल होत असून महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जात आहे. अशाप्रकारे सांगितले जात आहे मात्र नेमके हे काय बातमी आहे आपण व्यवस्थितरीत्या समजून घेऊया. महाराष्ट्र शासनाद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहे.
परंतु याच दरम्यान अनेक महिलांच्या खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत १ रुपयात जमा केला गेला आहे. त्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत होते या प्रश्नावरती उत्तर देत राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती देताना सांगितले की, पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक रित्या पडताळणी करण्याकरता प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यामध्ये १ रुपया जमा करण्यात येणार आहे. हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा एक भाग असणार आहे. तेव्हा या संदर्भात माता-भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजला बळी पडू नये असे त्यांनी आवाहन केले आहे.
सहकार्य करा : खालील दिलेल्या सोशल मीडिया आयकॉन वरती क्लिक करून ही महत्त्वाची बातमी तुमच्या सहकारी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.