LPG Gas Cylinder price:महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्वसामान्य आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आज एक ऑगस्ट 2025 व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी घसरण करण्यात आलेली आहे. 19 किलोच्या व्यवसायिक गॅसच्या किमतीत तब्बल ₹133.50 ची घट झालेली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात घसरण LPG Gas Cylinder price
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर रेस्टॉरंट,हॉटेल्स, आणि इतर व्यवसायिकांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे कपात व्यवसायिकांना दिलासा देणारी ठरत आहे. मागील चार महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत होती. परंतु आता झालेली कपात नक्कीच स्वागतार्थ आहे.
प्रमुख शहरांमधील 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवीन दर 1 ऑगस्ट 2025 :
नवी दिल्ली:₹1,631.50 कोलकाता :₹1,869,00 वरून ₹1,735.50 मुंबई :₹1,716.50 वरून ₹1,583.00 चेन्नई:₹1,923.50 वरून ₹1,790.00 घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणती बदल झालेली नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणती बदल करण्यात आलेले नाही. 14.2 किलोचा घरगुती एलपीजीएल सिलेंडरची किंमत आठ एप्रिल 2025 पासून आतापर्यंत स्थिर आहे.मागील चार महिन्यांपासून या दरांमध्ये कोणती वाढ झाली किंवा घट झालेली नाही.
प्रमुख शहरातील 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर पुढील प्रमाणे आहे.LPG Gas Cylinder price
दिल्ली:₹853.00मुंबई:₹852.50 कोलकाता:₹879.00चेन्नई:₹8668.50 इतके दर आहे.
उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना अनुदान किती मिळते.LPG Gas Cylinder price
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत (pmuy) सुमारे दहा कोटी कुटुंबांना प्रत्येक सिलेंडरसाठी ₹300 अनुदान दिले जात आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना गॅस सिलेंडर केवळ₹552 मध्ये मिळणार आहे.