HSRP Number plet:जुनी वाहने जी 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेली आहे. अशा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक आहे. नवीन वाहने एक एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेले अशा नवीन वाहनांमध्ये प्लेट अगदी पासूनच बसवली जाते.त्यामुळे त्यांना पुन्हा नवीन प्लेट बसवण्याची गरज नाही.

HSRP प्लेटचा नियम 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व प्रकारांच्या वाहनांना जसं, की मोटरसायकल ,कार ,ट्रॅक्टर आणि सर्व खाजगी वाहने यांना लागू होतो. नवीन वाहनांना म्हणजेच एक एप्रिल 2019 नंतर घेतलेल वाहनांना HSRP प्लेट बसवून मिळते. त्यामुळे त्यांनीही प्लेट बदलण्याची गरज नाही. जर जुन्या वाहनांना ही प्लेट लावली नाही. तर ₹5000 ते ₹10000 पर्यंत दंड आणि फायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकतं त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
HSRP नंबर प्लेट कोणत्या वाहनांसाठी किती खर्च?HSRP Number plet
महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट च खर्च वाहनांच्या प्रकारानुसार बदलतो. दूचाकीसाठी ₹५३१, तीन चाकी वाहनांसाठी रिक्षा ₹590. आणि चार चाकी किंवा त्याहून मोठा वाहनांसाठी कार ट्रॅक्टर ₹८७९ इतका खर्च येतो यामध्ये GST देखील समाविष्ट आहे.
HSRP नंबर प्लेट दर महाराष्ट्रातील मोटरसायकल, स्कूटर 531 रुपये तीन चाकी ऑटो :५९० रुपये चार चाकी आणि मोठी वाहने: ८७९ रुपये इतकी आहे. HSRP नंबर प्लेट लवकर बसवा.