हवामान अंदाज पुढील चार दिवस या भागात मुसळधार पाऊस पंजाबराव डख यांचा अंदाज (hawamaan Andaaz)

WhatsApp Group Join Now

hawamaan Andaaz : खरीप हंगामाची कामे तातडीने पूर्ण करून शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. काल अखेर राज्यामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे आगमन झालेले आहे. मान्सून हा सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर मध्ये पोहोचलेला आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पोहोचण्यास मान्सूनला पोषक हवामान तयार झालेले असून दहा ते 14 जून पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये मान्सून व्यापला जाणार आहे. अशी माहिती हवामान अभ्यासात तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेली आहे. याच दरम्यान पुढील चार दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी मे गर्जना सह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे.

hawamaan Andaaz
hawamaan Andaaz

मागील वर्षाच्या तुलनेमध्ये मान्सून यंदा वेळेपेक्षा आधी दाखल

मान्सूनच्या पावसाने मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा वेळेच्या अगोदरच हजेरी लावलेली आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. मान्सूनचे गुरुवारी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये आगमन झालेले आहे. त्याचबरोबर मानसून ने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक तेलंगणा किनारी आंध्र प्रदेशाच्या आणखी काही भागांमध्ये सुद्धा प्रगती केलेली आहे. अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागरामध्ये बहुतांश भागांमध्ये मान्सून पोहोचलेला आहे. मान्सूनची सीमा गुरुवारी रत्नागिरी सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगरम, इस्लामपूर पश्चिम बंगाल भागात होती.

२ ते ३ दिवसांमध्ये मान्सून पुणे मुंबई पर्यंत प्रगती करणार

मान्सून लवकरच संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये व्यापणार आहे. त्याचबरोबर तेलंगणा छत्तीसगढ ओडिसा आणि बंगालचे उपसाराचा आणखी भाग मान्सून व्यापणार आहे. अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्यातून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर २ ते ३ दिवसांमध्ये मान्सून पुणे मुंबई प्रगती करणार आहे. मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत होता. गुरुवार रोजी पुणे, जळगाव, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, धाराशिव, अकोला येथे पावसाची नोंद करण्यात आली आहे.

कुठे ऑरेंज अलर्ट तर कुठे येलो अलर्ट.?

येत्या 10 जून पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये सोसाट्याचा वारसह मे गर्जनेचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून येथे अतिवृष्टी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत