Favarni Pump Scheme : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारत देश हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी याकरता काही प्रमुख पिके याची उत्पादन शेतकरी जास्त प्रमाणात घेता यावे याकरिता शासनाकडून नुकतीच मोफत फवारणी पंप ही योजना राबविण्यात आली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेत करता अर्ज केलेला असून शेतकऱ्यांना फवारणी पंप केव्हा मिळेल याची प्रतीक्षा लागून आहे याबाबतची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेऊया.
सरकारकडून शेतकऱ्यांकरिता कृषी विभागाअंतर्गत नुकत्याच जाहीर केले गेलेल्या “बॅटरी ऑपरेट फवारणी पंप” ही योजना शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वकांक्षी योजना ठरणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असून सुद्धा त्यांना आपल्या शेतातील उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अवजारांची आवश्यकता भासते मात्र त्यांच्याकडे पुरेशे पैसे नसल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांना उत्पादन ओवाळीची इच्छा असून सुद्धा पुरेशी उपायोजना करता येत नाही याकरता सरकारने शेतकऱ्यांकरिता मोफत बॅटरी ऑपरेट फवारणी पंप शेतकऱ्यांना वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारकडून या योजनेचा मुख्य उद्देश हा आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न (Favarni Pump Scheme)
दरवर्षी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. काही वर्षी अतिवृष्टी तर काही वर्षी कोरडा दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी पुरेशी अवजारे विकत घेणे शक्य नसते, मागील काही वर्षांपासून दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची उत्पादकता ही दिवसेंदिवस घटत चाललेले असून शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या मालाला सुद्धा पुरेसा भाव मिळत नाही या सर्व गोष्टींचा समतोल टिकून ठेवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. शेतकऱ्यांना दरवर्षी आपल्या उत्पादन वाढीसाठी मुख्य गोष्ट म्हणजे फवारणी पंप असून तो शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीने मोफत स्वरूपात देण्याचा निर्णय सरकार द्वारे घेण्यात आलेला आहे.
मोफत फवारणी पंपाचे वाटप केव्हा होणार? (Favarni Pump Scheme)
सरकारकडून बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असून आता सर्वांना एकच ओढ लागली असून फवारणी पंप केव्हा मिळणार? असा प्रश्न ज्या शेतकऱ्यांनी फवारणी पंपासाठी अर्ज केलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच बॅटरी ऑपरेट फवारणी पंपाचे वाटप सुरू होणार आहे. बरेच शेतकऱ्यांना लॉटरी प्रक्रियेद्वारे पात्र ठरविण्यात आलेले असून त्यांच्या मोबाईल वरती पात्र असल्यास एसएमएस द्वारे सुद्धा कळवण्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारकडून आता मोफत फवारणी पंपाचे वितरण लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सरकारकडून अधिकृत माहिती आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मिळालेल्या रिपोर्टनुसार शेतकऱ्यांना लवकरच फवारणी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.
याकरिता शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ काही महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे यासाठी आधार कार्ड, डिजिटल पद्धतीचा सातबारा, बँकेचे पासबुक इत्यादी गोष्टी असणे आवश्यक असणार आहेत. या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांना या सर्व कागदपत्रांची पूर्तता प्रत्यक्षरीत्या कृषी कार्यालयात सादर करण्याबाबतच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या होत्या.
सरकारकडून कापूस व सोयाबीन मूल्य साखळी योजना (Favarni Pump Scheme)
सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी कापूस व सोयाबीन या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव मोफत बॅटरी ऑपरेट फवारणी पंप हे असून लवकरच या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ही योजना कापूस तसेच सोयाबीन (Favarni Pump Scheme) मूल्य साखळी विकास या मोठ्या योजनेचा एक महत्त्वाचा हिस्सा समजले जाते.
शेतकऱ्यांना या मूल्य साखळी विकास योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतीसाठी उत्पादन वाढ होण्याकरता ही योजना सरकारकडून राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पिक विमा वितरण प्रक्रिया व विपणन याकरता देखील मोठी मदत केली जात आहे. सरकारच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे नक्कीच शेतकऱ्यांना आपल्या उत्पादन वाढीसाठी मोठा हातभार लागणार आहे.
मोफत फवारणी पंप वितरणाच्या अंमलबजावणीसाठी विलंब (Favarni Pump Scheme)
शासनाद्वारे या योजनेची घोषणा केल्यानंतर काही कालावधी उलटला असला तरी, निर्माण झालेल्या अडचणीमुळे या योजने करता विलंब होताना दिसून येत आहे. या योजनेची सुरुवात करण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे. मात्र 9 सप्टेंबर 2023 रोजी लॉटरीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली असून लाभार्थी शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे सुचित करण्यात आलेले आहे व येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना हे फवारणी पंपाव वितरित केले जाणार आहे.
सोयाबीन व कापूस पिकासाठी आजपासून अनुदान वितरण
आज पासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 10,000 रुपये
सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. याबाबतचा शासन निर्णय सुद्धा पारित केलेला असून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची ईपीक पाहणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर ई पीक पाहण्याची नोंद आहे अशा शेतकऱ्याकडून त्यांचे आधार कार्ड व संमती पत्र मागवण्यात आलेले असून 10 सप्टेंबर 2023 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी त्यांच्या शिवारातील ग्राम पातळीवरती सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती.