विहीर, मोटर पंप, विज जोडणीसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांनो अर्ज केला का? (Farmer scheme)

Farmer scheme : राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांकरता विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये अनुसूचित जाती जमाती तसेच नवबौद्ध प्रवर्गांमधील शेतकऱ्यांकरता योजना असून यामध्ये अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळत आहे. कुठल्या गोष्टींसाठी अनुदान मिळते बघा नवीन विहीर खुदाई, जुनी विहीर दुरुस्ती, विद्युत पंप संच, विज जोडणी याकरता पैसे मिळत आहेत. याकरता अशा पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करणे गरजेचे आहे.

राजे तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांकरता विविध प्रकारच्या योजना राबवत असते. काही योजना ह्या १०० टक्के अनुदानावरती रुजू केल्या जात असतात. तर काहींना 25 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवून दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत असते तसेच यातून अनेक शेतकरी सधन झालेले आहे. तर राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गांमधील शेतकऱ्यांकरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जाते.

या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

कशासाठी किती अनुदान दिले जाते?

केंद्र तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्याकरता पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान सुद्धा मिळवून दिले जाते. मात्र या योजनेची सामान्य शेतकऱ्यांपर्यंत माहिती नसल्यामुळे ते या सर्व योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे खालील दिलेले माहिती व्यवस्थित रित्या वाचून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्या.

सिंचन विहिरीसाठी अडीच लाख रुपये (Farmer scheme)

दोन्ही प्रवर्गांमधील शेतकऱ्यांना सिंचन विहीर खुदाई साठी अधिकाधिक अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे या विहिरीमुळे पिकांना पाण्याची शाश्वत सोय होत आहे.

विद्युत पंपासाठी २० हजार रुपये

शेतकऱ्यांनी विहीर खुदाई केली किंवा काहींच्या विहिरीसाठी विद्युत पंप संच लागतो याकरता शासनाच्या वतीने 10HP पर्यंतच्या पंपासाठी तसेच डिझेल इंजिनसाठी २० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे.

विज जोडणी साठी 10 हजार रुपये

विहिरी वरील विद्युत पंप जोडणी करता वीज लागते यासाठी शासन अनुदान देते. ही जोडणी आकारणीसाठी 10 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

सूक्ष्म सिंचन संचाकरता 50 हजार रुपये

शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याकरता सूक्ष्म सिंचन संच लागतो. या अंतर्गत ठिबक संचाकरता ५० हजार तर तुषार संचाकरता 25 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे.

Farmer scheme
Farmer scheme
WhatsApp Group Join Now

जुनी विहीर दुरुस्ती करता 50 हजार रुपये

या प्रवर्गामधील शेतकऱ्यांची जुनी वीहीर असेल तर त्यांच्या दुरुस्ती करता ही अनुदान योजना महत्त्वाची ठरणार आहे. याकरता 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते या अनुदानातून शेतकरी विहिरीची डागडुगी करू शकतात.

हे अनुदान फक्त यांनाच देय

डिझेल इंजिन परसबाग आणि पाईप बाबीचा लाभ केवळ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमधील लाभार्थ्यांना देय आहे. परसबागे करता 500 रुपये तर पाईप साठी 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे.

लाभासाठी हे आहेत महत्त्वाचे निकष (Farmer scheme)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने करता अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्जदार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर तर इतर बाबींसाठी 0.20 हेक्टर क्षेत्र असणे गरजेचे आहे.

अर्ज कुठे करावा? (Farmer scheme)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी. तसेच योजनेच्या अधिक माहिती करता पंचायत समितीतील कृषी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून लाभ मिळवावा.

हे पण वाचा : आता तुम्हाला मिळणार 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर

सहकार्य करा : शेतकरी मित्रांनो खालील सोशल मीडिया आयकॉन वरती क्लिक करून ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत