तेलाच्या भावात मोठी घसरण तर,डाळीचे भाव वाढले; जाणून घ्या काय स्वस्त काय महाग?(edible oil price)

edible oil price : लग्नसराई होऊन आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आषाढ महिन्यामध्ये वारी सोहळ्याशिवाय मोठे कार्यक्रम नाहीत यातच आर्थिक मंदीचा परिणाम येतील किराणा बाजारावर झालेला दिसून येत आहे. महिनाभरापासून सुस्त असलेल्या किराणा बाजारात उठाव नसला तरी गहू आणि डाळीत तेजीचे वारे वाहत आहे तर मागणी घटल्याने खाद्य ते लिटर मागे तीन ते पाच रुपयांनी स्वस्त झालेले आहे.

आतापर्यंत बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी न होती मात्र श्रावणातील सण उत्सवामुळे मागणी वाढण्याची शक्यता असल्याने काही प्रमाणामध्ये तेजी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सुद्धा सांगितले आहे. कमी उत्पादनामुळे स्टॉक कमी आहे परिणामी डाळींचे दर वाढत आहेत दोन आठवड्यांपासून खाद्यतेच्या दरात लिटरमागे तीन ते पाच रुपयांनी घसरण झालेली आहे तर दुसरीकडे श्रावणामध्ये उपवासासाठी लागणारा साबुदाणा मात्र 70 ते 80 रुपये किलो आणि पॅकिंग भगरीचे दर हे 110 ते 120 रुपये किलो प्रमाणे सध्या तरी स्थिर आहे.

edible oil price 2024
WhatsApp Group Join Now

श्रावणामध्ये नागपंचमी रक्षाबंधन यानंतर भाद्रपद मध्ये गणेशोत्सव गौरी गणपती सणांमध्ये हरभरा तसेच तूर डाळीची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने डाळींच्या दरामध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तर मागील महिन्यांपासून काजूचे दर किलोमागे २०० रुपयांनी वाढलेले आहेत.

खाद्यतेलाचे सध्याचे भाव (प्रति लिटर) (edible oil price)

सोयाबीन तेल100 रुपये
सूर्यफूल तेल105 ते 108 रुपये
पाम तेल95 रुपये
शेंगदाणा तेल170 रुपये

हे पण वाचा : मोफत शिलाई मशीन योजना | 15 दिवसात लाभ | कागदपत्रे, पात्रता व अटी संपूर्ण माहिती

असे आहेत डाळींचे दर (प्रति किलो) (edible oil price)

तूर डाळ170 ते 180 रुपये
मुंग डाळ100 ते 110 रुपये
हरभरा डाळ80 ते 90 रुपये
मसूर डाळ85 ते 90 रुपये

गव्हाच्या दरामध्ये ४०० रुपयाची तेजी झालेली आहे. गव्हाची मागणी साधारण असून गेल्या काही दिवसांमध्ये क्विंटल मागे ४०० रुपयांची तेजी बघायला मिळत आहे बीडच्या बाजारात मध्यप्रदेशातून गव्हाची आवक होते. 3000 ते 3800 रुपयांपर्यंत गव्हाचे दर दर्जानुसार आहेत तर ज्वारीचे दर हे ३ हजार रुपये क्विंटल पासून पुढे आहेत

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत