E -pik pahni:ई पीक पाहणी सुरळीत चालू लवकर करा ही शेवटची तारीख आहे. इ -पिक पाहणी एप्लीकेशन मध्ये प्रॉब्लेम येत असल्याने शेतकऱ्यांनाही पीक पाहणी करणे अवघड झाले होते.मात्र,आता कालपासून ही पीक पाहणी ॲप सुरळीतपणे चालू झालेले आहे. आणि शेतकऱ्यांना सहजरीत्या इ-पिक पाहणी करता येत आहे.

ही पिक पाहणी शासकीय अनुदान पीक विमा तसेच अनुदान भरपाई इत्यादी शासकीय योजनांच्या अनुदानासाठी खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही पिक पाहणी करणे बंधनकारक आहे.आता हे ॲप सुरळीतपणे चालत आहे . तर ॲप मध्ये ई -पिक पाहणी कशा पद्धतीने करायची याबद्दल खालील माहिती दिलेली आहे.
ई -पिक पाणी कशा पद्धतीने करायची E -pik pahni
ॲप डाऊनलोड करा सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोअरवर पिक पाहणी हे ॲप डाऊनलोड करा.लगेच ते अपडेट करा. ॲप उघडल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर टाका. तुमचा मोबाईल वर एक ओटीपी येतो. तो ओटीपी टाकून लॉगिन करा. तुमची माहिती भरा यामध्ये तुम्हाला जिल्हा तालुका आणि गावाचे नाव निवडायचे खाते क्रमांक टाकायचा आहे. पिकाची माहिती भरा . आता तुम्हाला खरीप हंगामात निवडून तुमच्या शेतीतील पीक कोणते आहे. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि त्यातील पाणी कुठून मिळते .विहीर पावसाचे पाणी हे भरायचे आहे. ॲप मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या पिकांचे दोन फोटो काढून ते अपलोड करावे लागणार आहे. सर्व माहिती भरल्यावर एकदा ती तपासून पहा. आणि सबमिट बटनावर क्लिक करा. जर काही चूक झाली असेल, तर ती 48 तासाच्या आत दुरुस्ती करता येते.
ई -पिक पाहणी ही आहे शेवटची तारीख E -pik pahni
हे ॲप आता व्यवस्थित रित्या काम करत आहे .आणि पीक पाहणीची प्रक्रिया 24 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याची आहे. 24 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे.काही अडचण आल्यास तुम्ही तलाठी कार्यालयाशी संपर्क साधू शकता. आणि ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.