E-pik pahani: खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे.शासनाकडून आव्हान करण्यात आले आहे.की सर्व शेतकऱ्यांनी मुदतीत ई-पीक पाहणी करावी अन्यथा अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे.

ई -पिक पाहणी न केल्यास होणारे नुकसान E-pik pahani
ई -पिक पाहणी न केल्यास तुम्हाला खालील पाच महत्त्वाचा योजनांच्या लाभा पासून वंचित राहावं लागणार आहे.
शासकीय अनुदान: विविध शासकीय योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान बंद होऊ शकते, नुस्कान भरपाई: पूर, अतिवृष्टी किंवा गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास मिळणारे भरपाई मिळणार नाही. , पिक विमा: पिक विमा चा लाभ घेण्यासाठी इ-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे., विविध शासकीय योजनांच् योजनेसाठी अर्ज करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.त्या योजनांचा लाभ घेता येणार नाही., भावांतर योजना: पिकांच्या योग्य भावांसाठी दिलेली जाणणारी भावांतर योजना लाभ ही बंद होऊ शकतो.
ई -पीक पाहणीची प्रक्रिया E -pik pahani
ई -पिक पाहणी करण्यासाठी तुम्हाला 1 ते 20 ऑगस्ट या कालावधीत DCS या नावाचे नवीन ॲप्लिकेशन वापरून नोंदणी करावी लागते. तर तुमच्याकडे जुने एप्लीकेशन असेल तर ते काढून टाकावे.स्मार्टफोन नसलेल्यांना शेतकऱ्यांना इतरांच्या मदतीने वेळेत ई -पिक पाहणी करावी अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो.