पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे अशाप्रकारे करा तक्रार A टू Z संपूर्ण माहिती.! (Crop Insurance)

Crop Insurance : राज्यामध्ये सध्या पावसामुळे खूप भयावह स्थिती सुरू आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात दाणादाण उडाली आहे. विदर्भ सोबत मराठवाड्यामध्ये पावसाने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२४-२५ मधील विमाधारक शेतकऱ्यांना स्वतःच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेले असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत मध्ये विमा कंपनीला सूचना देणे बंधनकारक आहे.

Crop Insurance
Crop Insurance
WhatsApp Group Join Now

ही सूचना भीमा कंपनीला कशाप्रकारे द्यायची ऑनलाइन तक्रार कशाप्रकारे करायची? ऑनलाइन अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. ऑनलाइन तक्रार करणे एकदम सोपे आहे खालील दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता व पीक विम्याचा लाभ मिळू शकतात.

विमा कंपनीला तक्रार नोंदवण्यासाठी या स्टेप फॉलो करा

पिक विमा संदर्भात तक्रार देण्याकरता तुम्हाला पिक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमचा पिक विमा काढला असेल तर खाली स्टेप फॉलो करा.

  • सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर ला जाऊन Crop Insurance क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे
  • यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम पीक नुकसान असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे
  • यामध्ये पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायवाची क्लिक करून द्यायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती ओटीपी हा ओटीपी टाकून घ्यायचा आहे.
  • पुढील टप्प्यामध्ये हंगाम खरीप वर्ष 2024 योजना आणि राज्य निवड करून घ्यायचे आहे
  • यानंतर तुम्हाला नोंदणीचा स्रोत CSC असा निवडून घ्यायचा आहे यामध्ये पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाकून घ्यायचा आहे
  • ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार तुम्हाला द्यायचे असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायचे असेल तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करा.
  • यामध्ये नक्की कशामुळे तुमचे नुकसान झालेले आहे याचा तपशील भरून घ्यायचा आहे आणि पिकाचा फोटो काढून तिथे सबमिट करायचा आहे
  • यानंतर तुमची तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा docket ID तुमच्यासमोर तुम्हाला बघायला मिळेल यावरच तुम्हाला विमा मिळतो व त्यामुळे हा आयडी नंबर जपून ठेवायचा आहे

पिक विमा च्या अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा तुम्हाला तक्रार करता येईल

तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा झालेल्या नुकसानीची तक्रार करू शकता. याकरता प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला व्हिजिट करायचे आहे

शेतकऱ्यांचे 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी जमा होणार.!

यानंतर रिपोर्ट क्रॉप लॉस या ऑप्शन वरती क्लिक करून कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमच्या पिकाचा विमा काढण्यात आलेला आहे ती कंपनी तुम्हाला निवडून त्यात आपले सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे. त्यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा लिखित स्वरूपात सेव करून घ्यायचा आहे.

कृषी विभागाकडे अशाप्रकारे करा तक्रार

याकरता कृषी विभागाद्वारे हेल्पलाइन क्रमांक सुद्धा देण्यात आलेले आहे. यासाठी नुकसानीची तक्रार दाखल संबंधित विभागाद्वारे टोल फ्री क्रमांक 14447 या क्रमांकावर ती कॉल करू शकतात. तुमच्या झालेल्या नुकसानीची माहिती देऊन तक्रार नोंदवू शकता.

.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत