75 हजार शेतकऱ्यांना 55 कोटीचे पिक विमा भरपाई!Crop insurance payout

Crop insurance payout: खरीप 2024 मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुसकानी पोटी 75 हजार 677 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयांची पिक विमा भरपाई मिळणार आहे.

यासाठी आवश्यक निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

खरीप हंगामात 2024 मध्ये काढणीनंतर झालेला नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या एक हजार कोटी निधीची प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिलेली आहे.

खरीप हंगामा 2024 अंतर्गत काढणी पश्चात झालेल्या नुकसान पोटी शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सादर रक्कम किंवा विमा कंपन्यांना वितरित केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे.जिल्ह्यातील 78 हजार 812 शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसनिच्या तक्रारी दिलेला होत्या.

यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

पंचनाम्यनुसर यातील 75,हजार 677 शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरले,असून त्यांना 55 कोटीची विमा भरपाई मिळणार आहे. अधिसूचित क्षेत्रात म्हणजेच महसूल मंडळामध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी असल्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात प्रति हेक्टर सहा हजार दोनशे ते साडेसहा हजार रुपये इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति हेक्टर आठ ते साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे अशी अपेक्षा आहे.

राज्य शासनाचा हिस्सा विमा कंपन्यांकडे हस्तरीत केल्यानंतर लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पाठपुरावा करत येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *