Crop Insurance List: राज्यातीला शेतकऱ्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आलेली आहे.गेल्या अनेक दिवसंपासून विविध हंगामातील पीकविमा भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक आता संपलेली आहे.खरीप 2022 पासूनची तसेच खरीप 2024 आणि रब्बी हंगामातील सर्व थकित भरपाईची रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षांपासून पीक विमा कंन्यांमध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकरी सातत्याने आंदोलने करत होते.काही शेतकऱ्यांची खरीप 2022 पासूनची भरपाई बाकी होती,तर काहींना काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित रककम मिळालेली नव्हती.आता सरकारकडून ही सर्व थकबाकीची रक्कम एकाच वेळी वितरीत केली जाणार आहे. यामध्ये खालील बाबीचा समावेश आहे.
खरीप 2022 पासूनची थकित रक्कम,खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रीगरनुसार भरपाई ,रब्बी हंगामातील थकित रक्कम,राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना त्याच हप्ता आणि अनुदान वेळेवर दिलेली होते,मात्र,कंपन्याच्या विलंबामुळे शेतकरी नाराज होते.या निर्णयामळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.