शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 48 कोटी रुपये पिक विमा झाला जमा.! (Crop Insurance credit)

Crop Insurance credit : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे खरीप हंगाम २०२३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमधील पिक विमा भरपाई म्हणून 90 हजार 808 शेतकऱ्यांना 55 कोटी 49 लाख रुपये पिक विमा कंपनीने मंजूर केलेला आहे. त्यानुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यामधील 55 हजार 56 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 48 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. उर्वरित ६ कोटी रुपये वेगाने जमा करण्याचे काम सुरू आहे.

राज्य शासनाने भारतीय कृषी कंपनीची निवड बीड जिल्ह्यासाठी केली आहे मागील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी १ रुपया भरून विविध पिकांसाठी पिक विमा भरून आपले पीक संरक्षित केले होते, दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीला कॉल करून नुकसानीची माहिती दिली होती.

Crop Insurance credit 2024
Crop Insurance credit 2024
WhatsApp Group Join Now

त्यानंतर पुढे नुकसानीचे पंचनामे ठिकठिकाणी करण्यात आले. परंतु वेळेवर पिक विमा रक्कम मिळाली नव्हती यामध्ये पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले पिक विमा कंपनीस विमा नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

यादीमध्ये नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

आतापर्यंत मंजूर असलेल्या 55 कोटी 49 लाख रुपयांपैकी 48 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पद्धतीने जमा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काढणी पाश्चात ही मिळणार पिक विमा

  • काढणी पाश्चात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा विमा रक्कम मिळणार आहे.
  • काढणी पाश्चात झालेल्या नुकसानग्रस्त १०२२ शेतकऱ्यांना 96 लाख रुपये विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
  • पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विमा रक्कम खात्यावर जमा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.

सहकार्य करा : खालील दिलेल्या सोशल मीडिया आयकॉन वरती क्लिक करून ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत