Crop Insurance Approved : ज्या शेतकऱ्यांनी रब्बी तसेच खरीप हंगामातील पीक विम्यासाठी अर्ज केलेले होते अशा पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून 523 कोटी निधी करता मान्यता खरीपांमधील पिकांचा उत्पन्नावर आधारित जिल्ह्यामधील ४ लक्ष 56 हजार 128 शेतकऱ्यांनी याकरिता विमा उतरविला होता. अशा विमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळवण्याकरता केंद्रीय राज्यमंत्री (क्रीडा व युवा कल्याण) रक्षाताई खडसे तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्हा मधील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागासोबत वेळोवेळी बैठक घेऊन विमा कंपनीला निर्देश दिलेले होते.
त्याच्या माध्यमातून आता विमा कंपनीने 30 लक्ष 87 हजार 973 शेतकरी पिक विमा करता पात्र केलेल्या असून त्याकरता (ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स) कंपनीच्या माध्यमातून 523 कोटी 28 लक्ष निधी करता कंपनीकडून मान्यता घेतली आहे. आजपर्यंत तुझा जिल्हा मधील सर्वाधिक पिक विमा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या विषयाचे कॅबिनेट बैठकीमध्ये सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याकरता शासनाने विमा कंपनीस मागणी केलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
तालुक्या नुसार पिक विमा यादी (Crop Insurance Approved)
तालुक्याचे नाव | पात्र शेतकरी संख्या | निधी मंजूर |
अमळनेर | ५५ हजार ८२४ | 36 कोटी 10 लक्ष |
भडगाव | 23 हजार 771 | 11 कोटी 84 लक्ष |
भुसावळ | 8 हजार 476 | 7 कोटी 55 लक्ष |
बोडवड | 12 हजार 959 | 17 कोटी 84 लक्ष |
चळीसगाव | 57 हजार 589 | 112 कोटी |
चोपडा | 31 हजार 526 | 51 कोटी 21 लक्ष |
धरणगांव | 10 हजार 533 | 47 कोटी 95 लक्ष |
एरंडोल | 23 हजार 676 | 15 कोटी 21 लक्ष |
जळगाव | 12 हजार 585 | 4 कोटी 90 लक्ष |
जामणेर | 57 हजार 964 | 14 कोटी 4 लक्ष |
मुकताईंनगर | 2 हजार | 9 लक्ष 51 हजार |
पांचोरा | 46 हजार 116 | 93 कोटी 58 लक्ष |
पारोळा | 40 हजार 40 | 20 कोटी 94 लक्ष |
रावेर | 890 | 50 लक्ष 87 हजार |
यावल | 7 हजार 51 | 5 कोटी 91 लक्ष |
अशाप्रकारे एकूण 3 लक्ष 87 हजार 973 शेतकऱ्यांकरिता 523 कोटी 28 लक्ष 5389 रुपये (Crop Insurance Approved) निधी ओरिएंटल इन्शुरन्स इंडिया लिमिटेड कंपनी द्वारे मंजूर करण्यात आलेला आहे. आता यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
शेतकरी बांधवांकरिता प्रमुख आव्हान (Crop Insurance Approved)
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून कर्जदार आणि तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरता एक रुपया नामात्र एवढा इच्छित विमा हप्ता असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी खरीप 2024 मध्ये याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हान केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण रक्षाताई खडसे तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
यावर्षीचा पिक विमा काढण्याची अंतिम मुदत जवळ आलेली आहे त्यामुळे 31 जुलै 2024 च्या अगोदर तुमचा पिक विमा काढून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाईची तुम्हाला वेळेवरती मदत मिळेल.