Crop Insurance Approved : महाराष्ट्रमधील शेतकऱ्यांकरता एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. राज्य सारकरद्वारे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रकमेचे वितरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यामधील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सर्वात अगोदर या महत्वपूर्ण निर्णयाबाबतचे विविध पैलू आपन समजून घेऊया.
पीक विम्याची वितरण प्रक्रिया तीन टप्प्यात समजून घेऊया (Crop Insurance Approved)
- आगाऊ रकमेबाबत वितरण : सुरवातीला 33% शेतकऱ्यांना अगोदरच 95% आगाऊ पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला आहे. आता यांनातर उर्वरित 75%रकमेचे वितरण सुरू होणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत पुरवेल.
- या बाबत राज्य सरकारची भूमिका : राज्य सारकरद्वारे पीक विमा कंपण्याकडे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील सर्वेक्षण आणि अहवालांच्या आधारानुसार एक व्यापक वितरण करण्याची योजना सुरू आहे.
- लाभार्थी क्षेत्र किती आहे : महाराष्ट्र मधील 40 महसुली झोन मध्ये पिक विम्याचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, बीड, परभणी, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, सातारा, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, नांदेड, तसेच इतर जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे.
उर्वरित पीक विमा वितरण केव्हा केले जाईल? (Crop Insurance Approved)
बरेच शेतकरी आपल्याला विचारत असता की आमच्या जिल्ह्याच्या पीक विम्याची यादी आम्हाला पाठवा किंवा आमच्या जिल्ह्याचे पिक विमा वितरण केव्हा केले जाणार आहे. अशा सर्व नागरिकांसाठी ही महत्त्वाची माहिती ठरणार आहे. तुमच्या जिल्ह्याचे पिक विमा वितरण केव्हा केले जाईल याची माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या.
- उर्वरित जिल्ह्याचे मार्च 2024 पासून वितरण सुरू झालेल्या असून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार पिक विमा वितरण केले जात आहे. यामध्ये मुख्य बाब म्हणजे रब्बी पिक विमा ची रक्कम वितरित केले जाणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची सुद्धा वितरण करण्यात येत आहे.
- खरीप तसेच रब्बी पिक विमा वितरण : महाराष्ट्र मध्ये खरीप तसेच रब्बी या दोन्ही हंगामा करता पिक विम्याची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये काही जिल्ह्यांना पिक विमा वितरण करून झालेला आहे तसेच काही जिल्हे अजून बाकी आहेत. त्यामुळे लवकरच उर्वरित जिल्ह्याचे सुद्धा पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे.
पिक विमा वितरणाविषयी शेतकऱ्यांनी या गोष्टींची नोंद घ्या (Crop Insurance Approved)
- माहितीचा स्रोत : शेतकऱ्यांना अधिक सखोल माहिती हवी असेल तर स्थानिक कृषी अधिकारी कडून मिळवता येणार आहे. याबाबत अधिक काही शंका असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
- शासकीय अधिसूचना : पिक विमा वितरणाकरता शासनाद्वारे अधिकृत शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. या निर्णयामध्ये वितरणाविषयीच्या संपूर्ण अटी तसेच शर्ती सुद्धा नमूद केलेले आहेत.
- ऑनलाईन सविस्तर माहिती : शेतकरी त्यांच्या पीक विमा बाबत स्थितीची माहिती ऑनलाईन प्राप्त करू शकतात याकरिता अधिकृत सरकारच्या वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.
हे पण वाचा : मोफत शिलाई मशीन योजना,यासाठी अर्ज कसा कराल ?पात्रता काय ?कागदपत्रे कोणती?
सहकार्य करा : ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व पिक विमा च्या अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या.