या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक विम्याचे 2 कोटी 60 लाख जमा! यादीत तुमचे नाव बघा (Crop Insurance)

Crop Insurance : जिंतूर तालुक्यामधील वस्सा परिसरातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वस्सा शाखेमधून खरीप 2023 मधील सोयाबीन पीक विम्याचे २ कोटी साठ लाख रुपये 2280 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आली असून मंगळवारपासून विमा रक्कम वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला पिक विमा (Crop Insurance)

गतवर्षी वस्सा सह परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानी फुटी विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वस्सा येथे जमा करण्यात आली.

यानुसार बोर्डी, लिंबाळा, नागणगाव सह परिसरात मधील 2 हजार 280 शेतकऱ्यांच्या २ कोटी ६० लाख रुपये बँकेला मिळालेले असून, मंगळवारपासून विमा रक्कम वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे. यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये गर्दी करून आल्याची दिसत आहे.

Crop Insurance
Crop Insurance
WhatsApp Group Join Now

यादरम्यान विम्याचे पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी न करता एटीएम सुविधेचा सुद्धा लाभ घ्यावा, गावांना वारनिहाय विमा वाटपात सहकार्य करण्याचे आव्हान शाखाधिकारी अंबादास भोकर, तपासणीस गजानन देशमुख, अच्युत देशमुख, सचिव ज्ञानेश्वर राऊत, नारायण आव्हाड, शिवानंद कंठाळे आदी परिश्रम घेत आहेत.(Crop Insurance)

शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला किंवा नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी तुमच्यापर्यंत कव्हर करू शकू.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत