Crop Insurance 2024 : सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी रब्बी तसेच खरीप हंगामातील पिकासाठी एक रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती. अधिकृतपणे आपण जर बघितले तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच (PMFBY) म्हणून अशा प्रकारे ओळखले जाते. या योजनेच्या उद्देशाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिके आणि परिस्थितीमुळे होणारे नुकसान भरून काढण्याचा उद्देश ठरवण्यात आलेला आहे.
या योजनेवर ती देखरेख ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली करण्यात येते. सार्वजनिक तसेच खाजगी विमा कंपनीच्या सहभागाबद्दल बहु एजन्सी फेमवर्क माध्यमातून ही योजना लागू करण्यात येते. पिकाच्या नुकसानीचे जलद तसेच अचूक प्रमाणे मूल्यांकन करण्याकरता स्मार्टफोन सारख्या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर तसेच उत्पादन डेटामध्ये शेतातील हालचाली कमी करण्याकरता रिमोट सेन्सिंग तंत्रांना या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येते.
(PMFBY) या योजनेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती, आपत्ती तसेच रोगांसह पीक कापणी अगोदर पासून ते काढणी होईपर्यंत अशा टप्प्याटप्प्यानुसार यामध्ये समावेश केला जातो.या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15,000 रुपये! तुमचं नाव यादीत आहे का बघा? (Crop Insurance 2024) या योजनेच्या माध्यमातून अन्नधान्य तसेच तेलबिया आणि व्यावसायिक बागायती पिकांचा सुद्ध समावेश करण्यात येतो.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहे? (Crop Insurance 2024)
- या योजनेच्या माध्यमातून पिकाचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता आर्थिक सहाय्य प्रदान करून दिले जाते.
- नवीन तसेच आधुनिक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्याकरता कृषी क्षेत्रात पुरवठा निसू निश्चित करणे. त्याचप्रमाणे अन्नधान्य, तृणधान्ये, बाजरी, कडधान्य, तेल बियाणे वार्षिक व्यावसायिक बागायती पिकांचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो.
- या योजने करता मागील उत्पन्न डेटा सुद्धा उपलब्ध आहे.
- या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ ,पूर, अनेक प्रकारच्या रोगांसह अनेक जोखीमच्या सुद्धा समावेश केला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ७७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 51 कोटी जमा (Crop Insurance 2024)
बुलढाणा जिल्ह्यामध्ये गत खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई चा मोबदला म्हणून पात्र शेतकऱ्यांकरता पिक विमा कंपनीकडून रक्कम मंजूर झालेली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे. 12 जुलै पर्यंत दोन्ही अंगामातील मिळून 77 हजार एकशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यात 51 कोटी 43 लाख 30 हजार 813 वर्ग केले जाणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये अतिवृष्टी पावसाचा खंड अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पिक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज करून नुकसानीची सूचना दिली त्यानंतर पंचनामे करण्यात आले विमा रक्कम मिळते की नाही याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती अखेर कंपनीकडे सूचना केलेल्यापैकी पात्र ठरलेल्या दोन लाख 37 हजार 745 शेतकऱ्यांसाठी 149 कोटी 95 लाख 55 हजार 645 रुपयाची रक्कम विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेली आहे.
पिक विमा योजनेच्या यादीत नाव कशाप्रकारे तपासायचे?
- सर्वात अगोदर तुम्हाला PMFBY या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- तुम्ही जर अगोदरच नोंदणीकृत असल्यास तुमचा आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा. तुम्ही नोंदणीकृत सदस्य नसल्यास आवश्यक ती माहिती देऊन खाते तयार करा.
- तुम्ही लॉगिन झाल्यानंतर मुख्यपृष्ठावरील शेतकरी या ऑप्शन वरती क्लिक करून लाभार्थी यादी यावरती क्लिक करा.
- यानंतर तुमचे राज्य जिल्हा ब्लॉक आणि गावाचे नाव निवडून घ्यायचे आहे.
- यादीमध्ये तुमचे नाव शोधण्याकरता तुमचा वैयक्तिक तपशील जसे की तुमचे नाव आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे.
- अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने यादीमध्ये तुमचे नाव चेक करू शकता.