bij bhandval yojana : संत रोहिदास महामंडळाकडून विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करता 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते यावर्षी करिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे ५० हजार ते ५ लाखांपर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसाय करता वीज भांडवल योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या व्याज दराने पुरवण्यात येतो बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रकमेंपैकी 75 टक्के रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकांमार्फत देण्यात येते ५ टक्के रक्कम लाभार्थी बँकेकडे जमा करायची असते.
आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट bij bhandval yojana
श्री संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या मार्फत व्यवसाय करण्याकरता 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवली योजना राबवली जात आहे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
या आहेत योजना (bij bhandval yojana)
- मुदती कर्ज योजना १ लाखापासून ते ५ लाखांपर्यंत
- लघुरुण योजना ५० हजार ते १ लाख 40 हजार पर्यंत
- महिला समृद्धी योजना ५० हजार ते १ लाख पन्नास हजारापर्यंत
- महिला अधिकारी त्या योजना ५ लाख रुपये
- शैक्षणिक कर्ज योजनेत देशासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 30 लाख तर परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी ४० लाख अशा पाच योजना वर्ष 2024-२५ मध्ये सुरू केलेले आहेत
योजनेसाठी निकष काय?
बँक तसेच महामंडळात मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांकरता चर्मकार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, मोची, ढोर व लोहार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव महामंडळाचे जिल्हा कार्यालय येथे सादर करावे.
हे पण वाचा : युवकांसाठी जबरदस्त योजना ;आता मिळणार गॅरंटीशिवाय 20 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज
अर्ज प्रक्रिया सुरू /आवश्यक कागदपत्रे
- सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला
- तहसीलदारांकडून घेतलेला अर्जाच्या कुटुंबाचा चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
- नुकतेच काढलेले छायाचित्र तीन प्रतीत
- अर्जदारांना शैक्षणिक दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स ३ प्रती
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- व्यवसायिकाचे दर पत्रक
- ज्या जागेवरती व्यवसाय करायचा आहे त्या जागेची भाडे पावती अन्यथा करार पत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना ८- अ), लाईट बिल, टॅक्स पावती द्यावी लागते.
- अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव हा महामंडळाचे जिल्हा कार्यालयामध्ये सादर करता येणार आहे
मिळालेले टार्गेट
गोंदिया जिल्हा करता या योजनेअंतर्गत टार्गेट देण्यात आलेले असून लाभार्थ्यांना या योजने करता अर्ज सादर करता येणार आहे.
सहकार्य करा : ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून गरजू व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.