Bank Holidays in August List 2024 : ऑगस्ट 2024 मध्ये विविध सुट्ट्यांमुळे देशातील बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहे. मात्र या सगळ्या सुट्ट्या संपूर्ण देशात नाहीत अनेक सुट्ट्या स्थानिक पातळीवरील असल्यामुळे राज्यानुसार सुट्ट्यांची संख्या भिन्नभिन्न असणार आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी तसेच स्वातंत्र्यदिनासारखे सन व राष्ट्रीय उत्सव असणार आहे. त्यानिमित्त बँकांना सुट्ट्या राहणार आहे. याव्यतिरिक्त या महिन्यामध्ये चार रविवार सुद्धा आलेले आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ही सुट्टी नियमानुसार असणार आहे.
भारतीय रिझर्व बँकेद्वारे ऑगस्टमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली असून त्यानुसार नागरिकांनी आपल्या आर्थिक कामाचे नियोजन करून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
या दिवशी होणार नाही बँकेमधील कोणतेही काम (Bank Holidays in August 2024)
सुट्टी (तारीख) | कारण | कुठे? |
3 ऑगस्ट | केर पूजा | आगरताळा |
4 ऑगस्ट | रविवार | देशभर |
7 ऑगस्ट | हरियाली तीज | हरियाणा |
8 ऑगस्ट | तेंदोग लो रम फॅट | गंगटोक |
10 ऑगस्ट | दुसरा शनिवार | देशभर |
11 ऑगस्ट | रविवार | देशभर |
13 ऑगस्ट | पेट्रीतयट डे | इंफाळ |
15 ऑगस्ट | स्वातंत्र्य दिन | देशभर |
18 ऑगस्ट | रविवार | देशभर |
19 ऑगस्ट | रक्षाबंधन | अहमदाबाद, जयपुर,कानपूर, लखनऊ सह अनेक ठिकाणी |
20 ऑगस्ट | श्री नारायण गुरु जयंती | कोची व तिरुअनंतपुरम |
24 ऑगस्ट | चौथा शनिवार | देशभर |
25 ऑगस्ट | रविवार | देशभर |
26 ऑगस्ट | कृष्ण जन्माष्टमी | देशभर |
हे पण वाचा : तेलाच्या भावात मोठी घसरण तर,डाळीचे भाव वाढले; जाणून घ्या काय स्वस्त काय महाग?