anudan yojana: महाराष्ट्र राज्यात अजून बरेच शेतकरी पावसावर अवलंबून शेती करत आहे.

पण कधी पाऊस कमी तर कधी जास्त त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. यासाठी सरकारने एक चांगली योजना सुरू केलेली आहे.योजनेचे नाव आहे,अहिल्या शेळी पालन योजना.
योजना का सुरू केल्या गेली आहे.कारण सरकारला वाटत आहे, की शेतकऱ्यांना शेती सोबत आणखी एक उत्पन्न साधन असावे.म्हणजेच शेतात काही नुकसान झालं, तरी दुसऱ्या कामातून थोडे पैसे मिळतात. यामुळे शेतकऱ्यांचे घर चालवणे थोडे सोपे होते.
योजनेतून काय मिळतं anudan yojana
तुम्ही योजनेत अर्ज केला, तर तुम्ही पात्र ठरला, तर सरकार तुम्हाला दहा शेळ्या देते. हे सगळं मिळवण्यासाठी लागणाऱ्या पैशांपैकी 90% पैसे सरकार देत असते. 60% केंद्र सरकार आणि 30% राज्य सरकारकडून पैसे मिळतात. तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
शेळ्यांची जात सुद्धा चांगली असते- उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्या दिल्या जात आहे. या शेळ्या दुधासाठी व विक्रीसाठी उपयोगी पडत आहे. यामध्ये विमा व इतर खर्चासाठी सुमारे 10,000 रुपये लागतात. 90 टक्क्यांपर्यंत सरकारकडून मदत मिळत आहे.
अर्ज कोन करू शकणार आहे anudan yojana
अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्रातला असावा. सर्वात पहिले त्याच्याकडे एक ते दोन एकर शेत जमीन असावी. वय 18 ते 60 वर्ष असावे.महिला अर्जदारांना आधी संधी दिली जात आहे. मागील तीन वर्षात त्यांनी यापूर्वी अशा योजनांचा फायदा घेतलेला नसावा एका घरातून एकच व्यक्ती अर्ज करू शकतो घरात कुणी सरकारी नोकरी नसावा अनुसूचित जाती जमाती व गरीब महिलांना विशेष संधी आहे.
योजना गावात ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून राबवली जात आहे सरकारी कर्मचारी गावोगावी जाऊन याबद्दल माहिती देत आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी व महिलांनी यांचा फायदा घेऊ शकता.
जर तुम्हाला शेतीसोबत आणखी व्यवसाय करायचा असेल तर योजना नक्कीच उपयोगी पडेल. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.
Sheli palan