Aadhar Card : आधार कार्ड हरवले तर काय करायचे, आधार कार्ड आपल्या ओळखीचं व सरकारी आर्थिक कामासाठी महत्त्वाचा पुरावा आहे. बँक खाते उघडण्यापासून तर सरकारी योजनेचा लाभ घेण्यापर्यंत आधार कार्ड ची गरज प्रत्येक ठिकाणी पडत असते. अशा वेळी आधार कार्ड हरवलं आधार नंबर आठवत नाही. अशावेळी नक्कीच धांदल उडते. काळजी करण्याची काही गरज नाही आपण आधार सहजपणे मिळू शकतो.
भारतीय वैशिष्ट् ओळख प्रधिकरण (UIDAI ) आपल्याला हरवलेले आधार परत मिळवण्यासाठी आधार नंबर शोधण्याची ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन पर्याय सोप्या मार्गाने उपलब्ध आहे.

मोबाईल नंबर आधारशी लिंक असला तर Aadhar Card
ऑनलाइन प्रक्रिया
तुमच्या मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केलेला असला तर प्रक्रिया सोपी आहे.
UIDAI चा वेबसाईटवर जाऊन. तुम्हाला तिथे Retrieve UID/EID पर्याय दिसेल आधार नंबर(UID)हवा आहे. कोणताही एक पर्याय निवडा. स्क्रीनवर दिसल्यावर कॅप्चा कोड टाका.
मोबाईल व ईमेल वर(OTP) येईल . ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण करावी. पडताळणी नंतर आधार क्रमांक व नोंदणी आयडी एसएमएसद्वारे लगेचच मिळणार मोफत सेवा आहे.
फक्त बांधकामगारांसाठी! सरकार देणार थेट आर्थिक मदत – आजच अर्ज करा
ऑफलाइन प्रक्रिया Aadhar Card
आधार नोंदणी अपडेट केंद्राला भेट द्या.
तुम्हाला तिथे ऑपरेटरला तुमचे नाव लिंग जिल्हा व पिनकोड यांसारखी माहिती भरावी लागते.
माहितीची पडताळणी करण्यासाठी बायोमेट्रिक् पडताळणी फिंगरप्रिंट व आयरिस स्कॅन केला जातो.
माहिती जुडवल्यास ऑपरेटर ई-आधारची प्रिंट काढून देतात. तुम्हाला 30 रुपये शुल्क द्यावे लागतात.
UIDAI हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल Aadhar Card
UIDAI च्या हेल्पलाइन नंबर 1947 कॉल करू शकतो. कस्टमर केअर प्रतिनिधी बोलून त्यांचे नाव जन्मतारीख यांसारखी माहिती घेतात. योग्य माहिती असली तर तुमच्या नोंदणी आयडी(EID) दिल्या जातो.
EID मिळाल्यानंतर परत 1947 नंबर वर कॉल करा. आयव्हीआरएस प्रणाली निवडा. तुम्हाला EID, जन्मतारीख व पिन कोड प्रविष्ट करा माहिती जुडवल्यास तुमचा आधार क्रमांक सांगितल्या जातो . पूर्णपणे मोफत सेवा आहे.
आधार हरवले तर काय करायचं Aadhar Card
आधार कार्ड मूळ पत्र हरवलं तर आपण आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी आधार पुन्हा मिळू शकतो. आधार क्रमांक व 28 अंकी ईआयडी तो आपल्याला आधार पावती स्लिप वर मिळतो. बायोमेट्रिक पडताळणी व ईआधार ची प्रिंट दिली जाते. आधार हरवले असेल तर घाबरू नका ,खूप सोप्या पद्धती वापरून तुम्ही आधार परत मिळू शकतो.