SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दिनांक 13 मे 2025 रोजी वार (मंगळवार) जाहीर होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल आपल्या वेबसाईट वरती सर्वात अगोदर बघता येणार आहे.
इयत्ता दहावी हा शैक्षणिक वाटचाली मधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. यामुळे आपल्याला जर कमी गुण मिळाले किंवा आपण नापास झालो तर आपण सर्वच गमावलं असं वाटून घेऊ नका कारण दहावी नापास होऊन सुद्धा पुन्हा परीक्षा देऊन आपण भविष्यामध्ये आपले करिअर यशस्वीरित्या पार पाडू शकतो

दहावी नापास झालेले अनेक विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊन आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रगतीपथावर गेलेले आहे. त्यामुळे एक वेळ नापास झाल्यास कुठलेही चुकीचे कृत्य अन्यथा स्वतः खचून जाऊ नका. पुन्हा तुम्हाला नव्याने एक संधी दिली आहे असं समजून तुम्ही पुन्हा एक नवीन सुरुवात करू शकता. येणाऱ्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. अशा प्रकारचा सल्ला शैक्षणिक समुपदेशकांनी दिला आहे.
असा बघा निकाल
तुम्हाला जर तुमचा निकाल सर्वात अगोदर बघायचं असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा निकाल सर्वात अगोदर बघू शकता.
तुम्हाला जर तुमचा निकाल सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल वरती किंवा लॅपटॉप पीसी वरती बघायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट https://mahresult.nic.in/ ला विजिट करू शकता. आणि तुमचा निकाल सर्वात अगोदर बघू शकता.
निकाल कशाप्रकारे बघावा
तुम्हाला तुमचा निकाल जर सर्वात अगोदर बघायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला https://mahresult.nic.in/ या वेबसाईट वरती क्लिक करून ओपन करून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला समोर दिसणाऱ्या रकान्यामध्ये आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव रकान्यामध्ये इंटर करून घ्यायचे आहे त्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचा निकाल तुमच्यासमोर जाहीर करण्यात येईल.
सहकार्य करा : ही माहिती तुमच्या जवळील दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना आपला निकाल बघण्यासाठी सोयीस्कर होईल.