Crop Insurance Update : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकरिता खूप महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जुलै तसेच ऑगस्ट 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. त्यावेळेस राज्य सरकार द्वारे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरता पिक विमा घोषित केला गेला होता. यानुसार काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम सुद्धा मिळालेली आहे. परंतु उर्वरित 75 टक्के रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे.
उर्वरित 75 टक्के रक्कम लवकरच जमा (Crop Insurance Update)
पिक विमा कंपनी द्वारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यास नकार देण्यात आलेला होता. यामुळे पिक विम्याची 75 टक्के रक्कम ही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. परंतु याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के रक्कम जमा करून देण्यात येईल अशा प्रकारच्या आश्वासन शिंदे सरकारने दिलेले आहे.
हे पण वाचा :- या जिल्ह्यांचा पीक विमा झाला मंजूर यादीत नाव बघा.!
काही जिल्ह्यांना विमा कंपनी द्वारे अग्रींमची रक्कम देण्यास नकार देण्यात आलेला होता. कारण पिक विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार जिल्हा मध्ये पावसाचा खंड पडला असला तरी देखील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नव्हते. विमा कंपनीकडून या प्रकारची केंद्रीय समितीकडे अपील सुद्धा करण्यात आलेली होती. आता विमा कंपनी द्वारे केलेल्या अपील चा निकाल सुद्धा जाहीर करण्यात आलेला होता.
केंद्रीय समितीने दिलेला निकाल
केंद्रीय समिती मार्फत विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल देण्यात आलेला होता. त्यांच्यामध्ये पीक कापणीच्या प्रयोगा नंतर अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात येणार आहे. आणि याच्या अनुसरण अंतिम प्रयोगानंतर पिक विमा रक्कम दिली जाणार आहे. केंद्र समितीच्या निकालाच्या अनुसार या सात जिल्ह्यांना अग्रीम रक्कम मिळणार नाही. तसेच उर्वरित सर्व जिल्हे हे पीक विमा साठी पात्र राहतील.
अंतिम पैसेवारी बाबतच्या अपेक्षा
यामध्ये या सात जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यातील अंतिम टक्केवारी ही 50 टक्क्यांपेक्षा कमी आलेली आहे. अशा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता पूर्ण पीक विम्याची रक्कम मिळणार का नाही हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. परंतु या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याची अपेक्षा मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होत असल्याची शासनाने देखील मान्य केलेला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये उर्वरित 75 टक्के अग्रीम पीक विम्याची वाटप सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम जमा करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. जो जिल्हा मंजूर होईल त्याबाबतची सर्व माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती देण्यात येईल त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा.