3 gas cylinders free : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांकरता तसेच सामान्य नागरिकांकरता विशेष योजना . यामध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 ला अर्थसाख अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः महिला शेतकरी तसेच गरीब कुटुंबांकडता अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे त्या योजना कोणत्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण समजून घेऊया.
माझी लाडकी बहीण योजना (3 gas cylinders free)
माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत महिन्याला आर्थिक मदत प्रदान केले जाईल याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे
- या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना मिळेल
- पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये लाभ
- एक जुलै 2024 पासून अंमलबजावणी
- योजने करता वार्षिक तरतूद 46 हजार कोटी रुपये
- पहिला व दुसरा हप्ता रक्षाबंधन दिवशी वितरण
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मधील महिलांच्या आर्थिक समीक्षाकरनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत प्राप्त होणार आहे. यामुळे महिलांना पाठबळ मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना
- यामध्ये लक्षित गट पात्र कुटुंबे कमाल 5 सदस्य
- दरवर्षी ३ मोफत LPG गॅस सिलेंडर
- या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन चा वापर करण्यास प्रोत्साहन देणे
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईमुळे त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
शेतकरी कल्याणकारी योजना
- महाराष्ट्रातील 44 लाख शेतकरी लाभार्थी
- शेतकऱ्यांचे वीज बिलाची थकबाकी माफ
या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील शेतकऱ्यांकरिता मोठा दिलासा मिळणार आहे कारण वीज बिलाच्या थकबाकीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले होते. विज बिल माफी मुळे आता त्यांना याचा मोठा फायदा होईल.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक विम्याचे 2 कोटी 60 लाख जमा! यादीत तुमचे नाव बघा
वरील योजनेचा लाभ घेण्याकरता सामान्य नागरिकांकडे काही खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक खात्याचे तपशील