hawaman Andaj : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या स्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने जोर धरलेला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत काहीसा थांबलेला मोसमी पाऊस आता पुन्हा जोर धरून संपूर्ण राज्यभर बरसत आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.
याच दरम्यान हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला असून 18 जुलै पर्यंत राज्यात ठीक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे
राज्यातील या भागामध्ये हाय अलर्ट (hawaman Andaj)
भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये रत्नागिरी जळगाव या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई ठाणे पालघर या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आहे.
या भागात तुरळक ठिकाणी पाऊस (hawaman Andaj)
त्याचप्रमाणे मराठवाडा तसेच विदर्भामधील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरडत ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
या भागात मुसळधार पाऊस (hawaman Andaj)
विदर्भातील अमरावती अकोला भंडारा, गोंदिया चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या भागामध्ये विजांच्या कडकटासह आणि ढगांच्या गडगटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. याच वेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किलोमीटर राहील. अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
केरळ कर्नाटक आणि गोव्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत २० सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच दरम्यान सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र मध्ये गेल्या आठवड्याभरापासून सर्वत्रच मुसळधार पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळत आहे. मुंबई, पुणे शहर पावसाच्या पाण्याने पार तुंबले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात देखील पावसाने आता चांगला जोर पकडलेला आहे. त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आहे.