mukhyamantri vayoshri yojana : वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बलतेसाठीचे उपकरणे खरेदी करण्याकरता राज्य शासनाद्वारे मुख्यमंत्री महेश योजना राबविण्यात येत आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांचे वय 65 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर अशा व्यक्तींना या योजनेस पात्र ठरले जाईल. पात्र लाभार्थ्यांना थेट डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
राज्यामधील 65 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्याकरता आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याकरता मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेत पुन्हा 5 मोठे बदल महिलांना दिलासा ; पहा संपूर्ण माहिती
वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, खरेदी करण्यासाठी मोठी मदत होईल. उदा. डोळ्यांसाठी चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रस नंबर बेल्ट सईबाईकल कॉलर इत्यादी प्रकारचे जीवन आवश्यक वस्तूंचे खरेदी करू शकतील. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या कार्मीक विभागाच्या माध्यमातून नोंदणीकृत करण्यात आले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र येथे सहभागी होता येईल.या योजने करता निधीचे वितरण राज्य शासनातर्फे 100% करून देण्यात येणार आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (mukhyamantri vayoshri yojana)
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील दिलेली कागदपत्रे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स (लाभार्थी व्यक्तीचे बँक खाते आधार लिंक असावे)
- दोन पासपोर्ट फोटो
- स्वयंघोषणापत्र शासनाने दिलेले ओळख पटवण्यासाठी विहित केलेल्या अनेक कागदपत्रे शिधापत्रिका बीपीएल पत्रिका झेरॉक्स
- तसेच अर्जासोबत जोडलेली कागदपत्र स्वयंसाक्षांकित (स्वाक्षरी केलेली) असावी
तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष काय? (mukhyamantri vayoshri yojana)
आधार कार्ड हे पूर्ण जन्म दिनांक नोंद केलेल्या असावा जिल्हा प्रतिकारणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड असावे राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या माध्यमातून किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्ध काळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा लाभार्थ्यांची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसह कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरणे विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. तसेच प्राप्त होणारा लाभ दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाईल.
अशाप्रकारे करा अर्ज?
कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज सादर करावेत सदर योजनेच्या माध्यमातून 65 वर्षे व त्यावरील वयोवृद्ध नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याकरता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड कार्यालयामध्ये 31 जुलै पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करावा.