ladaki Bahin Yojna 2024 : लाडकी बहीण योजनेत पुन्हा 5 मोठे बदल ‘या’ महिलांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या काय बदल झालेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये महिलांना फॉर्म भरताना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता सरकारकडून पुन्हा नवीन जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. सरकारने जारी केलेला नवीन शासन निर्णय काय आहे व यामध्ये कुठले पाच बदल करण्यात आले आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.
सर्व महिलांकरता फॉर्म भरण्यासाठी केलेले ५ महत्त्वाचे बदल (ladaki Bahin Yojna 2024)
- कुटुंबाची व्याख्या : पती-पत्नी तसेच त्यांची अविवाहित मुले मुली अशी कुटुंबाची व्याख्या राहणार आहे.
- लाडकी बहीण योजने करता पोस्ट मधील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यास महिलेने सादर केलेल्या फोटोचा फोटो काढून अर्ज दाखल करण्यात येईल.
- नवविवाहित महिलेचे नाव जर रेशन कार्ड वरती नसेल तर त्या महिलेच्या पतीचे राशन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
- केंद्र आणि राज्य सरकार द्वारे राबविण्यात येणाऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सदर योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामध्ये शासन निर्णय अनुसार काही अटी व शर्ती लागू करण्यात आलेले आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15,000 रुपये! तुमचं नाव यादीत आहे का बघा?
अशाप्रकारे शासनाद्वारे (ladaki Bahin Yojna 2024) वरील पाच नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय सुद्धा 12 जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. वरील केलेल्या बदलामुळे आता महिलांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत ज्या महिलांना या विषयी माहिती नसेल त्या सर्व महिलांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.